गणेश दुडम, प्रतिनिधीपुणे, 27 मे : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) बोरघाटात एका अवघड चढणीच्या वळणावर एक निसान टेरेनो या कारने अचानक पेट (car burn) घेतला. या कारमध्ये एकाच परिवारातील सात महिला होत्या. या महिला तात्काळ खाली उतरल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पनवेल येथील विचुंबे या गावाहून हा परिवार कार्ल्याच्या एकविरा मातेचे दर्शनासाठी निघाले होते. परिवारातील इतर सदस्य दुसऱ्या गाडीने काही अंतर पुढे गेले होते.
पनवेल तालुक्यातील विचुंबे या गावाहून परदेशी परिवारातील सदस्य लोणावळ्याच्या कार्ला येथील एकविरा मातेच्या दर्शनास निघाले. दोन कार करून काही मंडळी निघाली. कारमध्ये जवळपास सात महिला होत्या. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजी देखील होत्या. त्या टेरेनो या कारने निघाले होते.
(नवनीत राणांच्या तक्रारीची दखल, राज्यातल्या बड्या अधिकाऱ्यांना नोटीस, दिल्लीत फैसला होणार)
या दरम्यान गाडीच्या पुढल्या भागातून धूर येतो आहे, असे चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने त्वरित कार थांबवली. त्याने सर्व महिलांना उतरण्यास सांगितले. या सर्वजणी उतरत असताना गाडीने अचानक पेट घेतला. वयोवृध्द महिलेला बाहेर काढताना सर्वांचाच जीव कंठाशी आला होता. पण काळ आला होता पण वेळ नाही या म्हणीनुसार साऱ्या महिला सुखरूप बाहेर पडल्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, खोपोली अग्निशमन दल हे सर्व तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाणी आणि फोमच्या सहाय्याने गाडीला लागलेली आग विझवण्यात आली खरी पण या आगीत संपूर्ण कार जाळून खाक झाली होती. या घटनेमुळे तब्बल दीड तास या महामार्गावर वाहतूक थांबवण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.