मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बर्थ डे' पार्टीला बोलावून पाजली दारू; पुण्यातील तरुणीवर तळजाई जंगलात बलात्कार

'बर्थ डे' पार्टीला बोलावून पाजली दारू; पुण्यातील तरुणीवर तळजाई जंगलात बलात्कार

Rape in Pune: पुण्यातील तळजाईच्या जंगलात एका 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape in Taljai forest) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीला बालावून (Called for birthday party) तिच्यावर अत्याचार केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

पुणे, 07 डिसेंबर: पुण्यातील तळजाईच्या जंगलात एका 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape in Taljai forest) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीला बालावून (Called for birthday party) तिच्यावर अत्याचार केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत 19 वर्षीय आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

शुभम सिताराम शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या 19 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो धनकवडी परिसरातील सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी कात्रज येथील 22 वर्षीय तरुणीनं सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीची आहेत. गेल्या काही काळापासून दोघं चांगले मित्र बनले होते.

हेही वाचा-गुंगीचं औषध देत 17 मुलींवर लैंगिक अत्याचार; प्रॅक्टिकलच्या बहाण्याने नेलं अन्...

दरम्यान, 5 डिसेंबर रोजी घटनेच्या दिवशी आरोपी शुभम याने वाढदिवसाची पार्टी असल्याचं सांगून पीडितेला तळजाईच्या शेवटच्या बस स्थानक परिसरात बोलावलं होतं. ठरल्याप्रमाणे सायंकाळी पाचच्या सुमारास पीडित तरुणी संबंधित ठिकाणी आली. यानंतर आरोपी शुभम याने आपला मित्र प्रतीक माने आणि फिर्यादी तरुणीला तळजाईच्या जंगलात घेऊन गेला.

हेही वाचा- Pune: मैत्रिणीच्या घरी जाऊन केला बलात्कार; लग्नाचं आमिष दाखवून मिटवलं प्रकरण पण...

याठिकाणी गेल्यानंतर संबंधित सर्वजण दोन ते अडीच तास जंगलातच दारू पीत बसले. पण कालांतराने थंडी वाढल्यानंतर, पीडित तरुणी आरोपी बसलेल्या ठिकाणीच शेजारी झोपी गेली. पीडित तरुणी झोपी गेल्याचं पाहून आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीनं सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शुभम शिंदे विरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape