पिंपरी चिंचवड, 29 नोव्हेंबर : पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावातील गुंडांनी (goons) धुडगुस घातल्याचा मनात धडकी भरवणारा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दिघी (dighi) परिसरात कबूतरबाजीवरून (pigeons) झालेल्या भांडणानंतर गाव गुंडाच्या एका टोळक्याने 20 - 25 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
दिघीच्या चिमाजी वाळके नगर इथं ही घटना घडली आहे. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ५ ते ६ गावगुंडांनी वाहनांची तोडफोड केली. एका बुलेटला पेटवून दिले. हातात कोयते आणि धारदार शस्त्र घेऊन या टोळक्याने धिंगाणा घातला होता. या टोळक्यातील दोघे जण कबुतरांसाठी बांधलेली लोखंडी शेड तोडत होते. तर काही जण रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करत होते. हा सगळा प्रकार समोर असलेल्या सोसायटीतील काही जण ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होते.
या टोळक्यातील एका तरुणाला कुणी तरी आपला व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे, असं दिसल्यावर त्याने सोसायटीच्या दिशेनं दगडफेक केली. वाहनाची तोडफोड केल्यानंतर या टोळक्याने कबुतराची ढाबळ जाळून टाकली. ज्यामध्ये 8 कबुतरांचा होरपळून मृत्यू झाला. तर तिथेच उभी असलेली एक बुलेट जाळून टाकली. गाव गुंडांनी राडा घालताना तीन ते चार जणांवर धारदार शस्त्राने वारही केल्याचं बोललं जातंय.
यंदाही आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास मनाई?कोरोनाच्या संकटाचा फटका
ही घटना घडली तेव्हा हल्लेखोर गांजाच्या नशेत असल्याचंही काही स्थानिकांनी नाव न देण्याचा अटीवर सांगितलं. दरम्यान, वाहन तोडफोड करणाऱ्या गाव गुंडांविरोधात दिघी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस वाहन तोडफोड करणाऱ्या गुंडाचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.