Home /News /maharashtra /

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारले, केतकी चितळेचा मुद्दाही केला उपस्थितीत

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारले, केतकी चितळेचा मुद्दाही केला उपस्थितीत

 केतकीवर 28 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे. पण अमोल मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही

केतकीवर 28 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे. पण अमोल मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही

केतकीवर 28 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे. पण अमोल मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही

पुुणे, 20 मे - राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावले आहे. मात्र, केतकी चितळे (ketaki chitale) प्रकरण, अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने (brahman mahasangh pune) शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण नाकारले आहे. या बैठकीला आमचा कोणताही पदाधिकारी जाणार नाही, अशी भूमिकाच महासंघाने घेतली आहे. शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावलं आहे. गेल्या 40 वर्षात पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांच म्हणणं असं आहे की, तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण सांगावं, असा दावा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे. मात्र, पवा रांना पूर्ण कल्पना आहे की, आपली नाराजी का आहे. समर्थ रामदास, कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी,संभाजी ब्रिगेड,श्रीमंत कोकाटे,बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू पण अगदी परवाच्या प्रकरण नंतर त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांना शब्द माघार घ्यायला सांगायचं होतं. पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली, त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही ) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली, आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिले, असंही दवे म्हणाले. (Career Tips: मॅनेजमेंटमध्ये Admission साठी CMAT Exam देणं आवश्यक; वाचा पॅटर्न) तसंच, केतकी चितळे पूर्णतः चुकल्याचं, पण त्यांच्यावर राष्ट्रवादीनेही टीकाच केली, पण पवार साहेबांनी जर केतकी यांना माफ करून जर गुन्हे मागे घेण्यास सांगितलं असतं तर ते खूप मोठे झाले असते. पण केतकीवर 28 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे. पण अमोल मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. 'काही संस्था निश्चितच मीटिंगला जात आहेत, त्यांना शुभेच्छा इतरांनी काय करावे हे आपण कधीच सांगत नाही. आपण आपली भूमिका ठरवण्या आधी मी स्वतः सर्व विश्वस्त, कार्याध्यक्ष यांच्या बरोबर बोलून त्यांची पण मते जाणून घेतली, आज प्रवासात सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली त्यांना सुद्धा हेच पटत आहे. आमचा पवार साहेबांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही पण राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी मिटकरी, भुजबळ यांची वक्तव्य यांच्या बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे, अशी टीकाही दवेंनी केली. (Sheena Bora case : Indrani Mukherjea जेलबाहेर, पहिला video आला समोर) प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून ही मीटिंग होत आहे. ते सर्व ब्राह्मण संस्थांबरोबर संपर्क ठेवून असतात, त्यांच्या विषयी आपल्याला आदर आणि सन्मानच आहे.परंतु, पवार साहेबांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असं आम्हाला वाटतं. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नाही, असं आनंद दवेंनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या