मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तिच्यासाठी कायपन... पुण्यातील प्रियकराने प्रेयसीसाठी एक-दोन नाही तर चोरल्या तब्बल 15 गाड्या

तिच्यासाठी कायपन... पुण्यातील प्रियकराने प्रेयसीसाठी एक-दोन नाही तर चोरल्या तब्बल 15 गाड्या

13 तारखेला गस्तीदरम्यान, ट्रान्सपोर्टनगर परिसरात मारुती 800 ही लाल रंगाची कार संशयितरित्या फिरताना दिसली.

13 तारखेला गस्तीदरम्यान, ट्रान्सपोर्टनगर परिसरात मारुती 800 ही लाल रंगाची कार संशयितरित्या फिरताना दिसली.

13 तारखेला गस्तीदरम्यान, ट्रान्सपोर्टनगर परिसरात मारुती 800 ही लाल रंगाची कार संशयितरित्या फिरताना दिसली.

पुणे, 17 जुलै : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमात पडल्यावर अनेकदा व्यक्ती अशी काही पाऊले ऊचलतो की त्याच्या लक्षातही येत नाही की तो काही चुकीचं करतोय. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. प्रेयसीला फिरवण्यासाठी एका बहाद्दराने एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - या प्रकरणातील आरोपी प्रियकराचे नाव यश सोळसे असे आहे. त्याला वाहन चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ होत आहेत. यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमे अंतर्गत विविध वाहणाची तपासणी करत असताना त्यांना हा आरोपी कार चालविताना आढळून आला. ती चालवत असलेली कार ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ही कार चोरल्याचे सांगितले. यानंतर त्याने केलेल्या सगळ्या चोऱ्या पोलिसांनी उघड केल्या. तसेच त्याच्याकडून त्याने चोरलेले एकूण 15 वाहन हस्तगत करत त्याला अटक केली. 13 तारखेला गस्तीदरम्यान, ट्रान्सपोर्टनगर परिसरात मारुती 800 ही लाल रंगाची कार संशयितरित्या फिरताना दिसली. यानंतर वाहन चालकाला हटकले असता तो तिथून पळाला. यानंतर त्याचा पाठलाग करुन पकडण्यात आले. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर कसून चौकशी केली असता त्याने ही कार चोरी केल्याचे सांगितले. हेही वाचा - पुण्यातील भीषण आगीत लग्नासाठी आणलेले साहित्य नष्ट, 15 घरं जळून खाक जप्त करण्यात आलेल्या वाहनांची यादी
जप्त करण्यात आलेल्या वाहनांची यादी
प्रेयसीसाठी केली वाहनांची चोरी - तसेच त्याने आतापर्यंत 15 वाहन चोरी केली. यात. 2 चारचाकी तर 13 मोटरसायकलींचा समावेश आहे. त्याच्याकडून ही सर्व वाहने आणि 3 लाख 45 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही वाहने कशासाठी चोरली हे विचारले असता त्याने ही सर्व वाहने आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी चोरली, असे सांगितले.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Pune crime news

पुढील बातम्या