मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराचं भयानक कृत्य, पाच दिवसांनी झाला खुलासा

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराचं भयानक कृत्य, पाच दिवसांनी झाला खुलासा

पाच दिवसांपूर्वी एका तरुणीचा थेऊर येथील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात खून करण्यात आला होता.

पाच दिवसांपूर्वी एका तरुणीचा थेऊर येथील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात खून करण्यात आला होता.

पाच दिवसांपूर्वी एका तरुणीचा थेऊर येथील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात खून करण्यात आला होता.

    पुणे, 11 जुलै : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Pune Crime News) पुण्यात एका तरुणाने चारित्र्याच्या संयशावरुन आपल्याच प्रेयसीची हत्या (Girlfriend Murder Pune) केल्याचा खुलासा झाला आहे. पाच दिवसांपूर्वी थेऊरमध्ये एका तरुणीची हत्या (Young Girl Murder Pune) करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत आरोपी प्रियकराला (Accused Boyfriend Arrested Pune) अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पाच दिवसांपूर्वी एका तरुणीचा थेऊर येथील चिंतामणी हायस्कूलसमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात खून करण्यात आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकणी तपासाला सुरुवात केली होती. हत्या झालेल्या तरुणीची ओळख पटली आहे. याप्रकरणाचा खुलासा झाला आहे. चारित्र्याचा संशयावरुन प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीच्या आईसोबत पोलिसांनी तपासादरम्यान संवाद साधल्यावर ही माहिती समोर आली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटकाला केली आहे. महेश पंडित चौगुले (वय 24, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. चिवरी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. चारित्र्याचा संशय घेत त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली, असा खुलासा पोलिसांनी केलेल्या तपासात झाला आहे. महेश पंडित चौगुले हा आरोपी एका हॉटेलमध्ये काम करत होता तर त्याची प्रेयसी ही केअरटेकरचे काम करत होती. ते दोघेही एकाच गावात असल्यामुळे पाच महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, या प्रेमसंबंधानंतर तो आपल्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. त्यातूनच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हेही वाचा - लॉजवर नेत तरुणाने प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तसेच त्याने खुनाची कबुलीही दिली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन आपण आपल्या प्रेयसीची हत्या केली, असे त्याने सांगितले. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Girlfriend, Murder Mystery, Pune crime news

    पुढील बातम्या