मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लॉजवर नेत तरुणाने प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार

लॉजवर नेत तरुणाने प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दोन्ही प्रियकर आणि प्रेयसी पुण्यातील एका लॉजवर गेले होते.

दोन्ही प्रियकर आणि प्रेयसी पुण्यातील एका लॉजवर गेले होते.

दोन्ही प्रियकर आणि प्रेयसी पुण्यातील एका लॉजवर गेले होते.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 11 जुलै : प्रेमात पडल्यावर तरुण-तरुणी एकमेकांसाठी पुढील संसाराची स्वप्ने पाहतात. (Girlfriend Boyfriend Pune) अनेक जणांचे प्रेमप्रकरणांतून लग्न (Marriage) होते. तर काहींचे होत नाही. प्रेमाला नकार दिल्यानंतर आत्महत्येचे (Suicide in Love) प्रकारही समोर येतात. पुण्यात मात्र, प्रेमप्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रियकराने लॉजवर नेऊन आपल्या प्रेयसीची हत्या (Boyfriend Killed his Girlfriend Pune) केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

दोन्ही प्रियकर आणि प्रेयसी पुण्यातील एका लॉजवर गेले होते. त्याठिकाणी प्रेयसीला लॉजवर आणल्यानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली. दुसऱ्या दिवशी रुमची साफ-सफाई करायला आलेल्या कामगाराने रुमची पाहणी केली. यावेळी त्याला बाथरुममध्ये तरुणीचा मृतदेह हा रक्क्ताच्या थारोळ्यात दिसून आला. दिप्ती काटमोडे (वय 24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर घडली.

या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिप्ती तिच्या प्रियकरासोबत लॉजवर रात्री आली होती. यानंतर तिची हत्या झाली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी हा फरार आहे. तसेच पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहे.

हेही वाचा - Video : पुण्याच्या दोन नृत्यांगनांचं किळसवाणं कृत्य; लग्नात अश्लील हावभाव करीत बीभत्स डान्स, अखेर गुन्हा दाखल

पुण्यात शिक्षकाचाही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार -

पुण्यात महापालिकेच्या शाळेत पीटी क्लास (PT Class Teacher Pune) घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एक शिक्षक नेमण्यात आले होते. या नेमलेल्या शिक्षकानेच अनेक अल्पवयीन मुलींची लैंगिक छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहंमद कय्युम अन्सारी (वय 18, रा. कोंढवा खुर्द), असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Pune crime