पुणे, 21 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची साताऱ्यातली भर पावसातली प्रचारसभा अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. हीच सभा राष्ट्रवादीसाठी मैलाचा दगड ठरली होती. आता शरद पवारांची कॉपी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुण्यात भर पावसात भाषण ठोकलं. चंद्रकांतदादांचा हा पावसातील भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भरपावसात कार्यक्रम pic.twitter.com/46R3GVsbxO
— News18Lokmat (@News18lokmat) November 21, 2021
फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झालं. यावेळी चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू होतं. त्यामुळे त्यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
"मुख्यमंत्री साहेब सर्व वर्गांच्या शाळा सुरु करा"; मुंबईतील पालकांची मागणी
चंद्रकांतदादा पाटील यांच्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.
संयम राखला की संधी मिळते -चंद्रकांत पाटील
दरम्यान, भाजपचे नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना संधी देण्याबद्दल भाष्य केलं.
मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करा
'विनोद तावडे यांना संधी देण्यात आली. याचा मला मनापासून आनंद आहे. संयम आणि निष्ठा ठेवली की पुन्हा संधी मिळतेच. पंकजा मुंडे यांनी जे विधान केले. त्याचा माध्यमे अर्थ लावतात, तसं काही नाही. त्यांना संघटनेची जबाबदारी आहे. चुकीचा अर्थ लावू नका. चंद्रशेखर बावनमुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. पंकजाताईंना संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, असं पाटील म्हणाले.
'शिवसेना आमच्यापासून दूर गेल्यानंतर आमचं हिंदुत्व काही कमी झालं नाही. सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा आम्ही सभागृह बंद पाडले. सेना-भाजप एकत्र असताना हिंदुत्वावर आघात झाल्यावर बाळासाहेब कडाडून हल्ला करायचे, त्यातून अनेकांची हिंमत व्हायची नाही. पण म्हणून काही बिघडलं नाही. आम्ही आमचं मिशन रक्तातच ठेवलंय' अशी टीकाही पाटलांनी शिवसेनेवर केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.