मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपने फासे टाकले, आढळरावांच्या अडचणी वाढणार! कोल्हे काय निर्णय घेणार?

भाजपने फासे टाकले, आढळरावांच्या अडचणी वाढणार! कोल्हे काय निर्णय घेणार?

ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच आता शिरूर मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे.

ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच आता शिरूर मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे.

ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच आता शिरूर मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

शिरूर, 24 नोव्हेंबर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरूवात केली आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दौरा झाला, यानंतर आता ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच आता शिरूर मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे.

उमेदवार कोणीही असो, शिरूरमध्ये भाजपच लढेल, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केला आहे. आढळराव पाटीलच काय, अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे, असं प्रल्हादसिंग पटेल म्हणाले आहेत, त्यामुळे शिरूरमध्ये भाजपचा उमेदवार कोण? आढळराव पाटील किंवा अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आतापासूनच भाजप नेत्यांचे शिरूर मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत.

सितारमण यांच्यानंतर जोतिरादित्य महाराष्ट्रात, यावेळी NCP नाही तर शिंदेंचेच मतदारसंघ रडारवर!

मागच्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आपल्या चित्रपटासाठीही अमोल कोल्हे अमित शाह यांना भेटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनालाही अमोल कोल्हे गैरहजर राहिले. गुजरात निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अमोल कोल्हे यांचं नाव नव्हतं. या सगळ्या घटनांमुळे अमोल कोल्हे वेगळा निर्णय घेणार का? अशा चर्चांना उधाण आलं. अमोल कोल्हे यांनी मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली.

First published:

Tags: BJP