Home /News /maharashtra /

Pune : SPPU मध्ये 'हा' कोर्स केला; तर Job आणि Business दोन्हीही करता येतं, कसा कराल अर्ज?

Pune : SPPU मध्ये 'हा' कोर्स केला; तर Job आणि Business दोन्हीही करता येतं, कसा कराल अर्ज?

बीबीए- एचएफएम- व्यवस्थापन क्षेत्रातील कारकीर्दीची उत्तम संधी

बीबीए- एचएफएम- व्यवस्थापन क्षेत्रातील कारकीर्दीची उत्तम संधी

बीबीए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फोनिक्स, पॅव्हेलियन, वेस्टएंड, बीव्हीजी, सीएलआर, मॅरिएट, यासारख्या नामवंत कंपन्यांत चांगली नोकरी मिळू शकते. त्यामुळं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीबीए (हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट) साठी प्रेवश घ्या.

पुढे वाचा ...
  पुणे, 27 जून : बदलती अर्थव्यवस्था, बदलते तंत्रज्ञान, नव्याने उपलब्ध होत असलेली उत्पादने आणि बाजारपेठा यामुळे व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सतत काहीतरी नवे बदल  घडत असतात. नव्या संधी उपलब्ध होतात आणि नवी आव्हानेही निर्माण होत असतात. अर्थातच त्यामुळं व्यवस्थापन शिक्षण (Management sector) हे एक सतत ‘हॅपनिंग’ असे क्षेत्र आहे. शिवाय त्यातून नोकरी व्यवसायाच्या अनेक संधीही उपलब्ध होत असतात. बारावीनंतर आपणही व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असालतर बीबीए (हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट) या कोर्ससाठी (BBA course in pune university) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ॲडमिशन घेवू शकतात.  बीबीए हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट हा तीन वर्षांचा आणि शैक्षणिक क्रेडीट व्यवस्थेवर आधारीत अभ्यासक्रम आहे. त्यानुसार व्यवस्थापन क्षेत्रातील पायाभूत विषयांसोबतच सेवा व किरकोळ विक्री याही क्षेत्रातील विषय इथे शिकविले जातात. व्यवस्थापनाचे पायाभूत ज्ञान व काही क्षेत्रातील विषयनिष्ठ व्यवस्थापनाचे ज्ञान व कौशल्ये यांचा एक उत्तम मेळ या अभ्यासक्रमामध्ये घातला गेला आहे. म्हणूनच या पदवीमुळे व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम पाया तर घातला जातोच शिवाय पदवीनंतरच नोकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनाही त्यादृष्टीने संधी उपलब्ध होऊ शकतात.  वाचा : Mumbai : पब्लिक रिलेशन ऑफिसर व्हायचंय? मुंबई विद्यापीठात सुरू झालीय प्रवेश प्रक्रिया, असा करा अर्ज या अभ्यासक्रमाबाबत बोलताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, सुविधा व्यवस्थापन अर्थात फॅसिलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रातील उद्योगविश्वाशी आम्ही उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत. खरतर नुकतीच पदवीधर झालेल्यांसाठी या क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या खुप संधी आहेत. पण त्यादृष्टिने पदवीपातळीवरचे अभ्यासक्रम मात्र फारसे उपलब्ध नव्हते. ती पोकळी आम्ही या पदवी अभ्यासक्रमाद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. हा अभ्यासक्रम फक्त पदवीच नाही तर नावीन्यपूर्ण, सखोल आणि कौशल्यपूरक शिक्षणाद्वारे सुविधा व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये उपयुक्त आणि समर्पक व्यावसायिक संधीही उपलब्ध करून देतो. बीबीए हा एक व्यापक पायावर आधारलेला व्यवस्थापन अभ्यासक्रम आहे. सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण आणि कौशल्ये देण्यावर या अभ्यासक्रमाचा भर आहे. विभागाच्या प्रमुख डॉ. सुरभी जैन म्हणाल्या, "हा तीन वर्षांचा आणि शैक्षणिक क्रेडीट व्यवस्थेवर आधारीत अभ्यासक्रम आहे. त्यानुसार व्यवस्थापन क्षेत्रातील पायाभूत विषयांसोबतच सेवा व किरकोळ विक्री याही क्षेत्रातील विषय इथे शिकविले जातात. व्यवस्थापनाचे पायाभूत ज्ञान व काही क्षेत्रातील विषयनिष्ठ  व्यवस्थापनाचे ज्ञान व कौशल्ये यांचा एक उत्तम मेळ या अभ्यासक्रमामध्ये घातला गेला आहे. म्हणूनच या पदवीमुळे व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम पाया तर घातला जातोच शिवाय पदवीनंतरच नोकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनाही त्यादृष्टीने संधी उपलब्ध होऊ शकतात."

  वाचा : महाराष्ट्राचं सत्तानाट्य, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या कोर्टात येणार बॉल?

  प्रवेशासाठी पात्रता?  कोणत्याही शाखेतून किमान 45 टक्के गुण मिळवलेले पाहिजेत. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबातील 40 टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो. अर्थात त्यासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. महाराष्ट्र सरकारचे प्रवेशातील आरक्षणासंबंधीचे सर्व नियम या अभ्यासक्रमाला लागू आहेत. या अभ्यासक्रमासाठी बहुपर्यायी प्रश्नांवर आधारीत 100 गुणांची ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील तसेच देशभरातील प्रमुख शहरातील विविध केंद्रामध्ये दि. 21 जुलै 2022 रोजी ही परीक्षा घेण्यात येईल.

  गुगल मॅपवरून साभार...

  फार्म कसा भराल? या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेश अर्जासाठी क्लिक करा- https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx हा अभ्यासक्रम तसेच प्रवेश परीक्षेचा सिल्याबस याबद्दलची अधिक माहिती www.pumba.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. या संदर्भात प्रश्न वा शंका असल्यास pumba.bbahfm@gmail.com या पत्त्यावर मेल करता येईल. विभागाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती लिंक्डइन, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील विभागाच्या पेजवर उपलब्ध आहे. शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे? बीबीए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फोनिक्स, पॅव्हेलियन, वेस्टएंड, बीव्हीजी, सीएलआर, मॅरिएट यासारख्या नामवंत कंपन्यांत चांगली नोकरी मिळू शकते. 
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Pune

  पुढील बातम्या