मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Baramati Dog Bite : कुत्र्याने चिमुकल्या मुलाचे तोडले लचके पुढे जे झालं ते भयानक, बारामतीतील घटना

Baramati Dog Bite : कुत्र्याने चिमुकल्या मुलाचे तोडले लचके पुढे जे झालं ते भयानक, बारामतीतील घटना

उसतोड करणाऱ्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

उसतोड करणाऱ्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

उसतोड करणाऱ्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 16 नोव्हेंबर : उसतोड करणाऱ्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. बारामती तालुक्यातील कोराळे येथे ऊस तोडणी करायला गेलेल्या मजुराच्या लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने त्या लहान मुलाच्या तोंडाच्या पूर्णपणे चिंधड्या केल्या होत्या. दरम्यान त्या मुलावर उपचार करण्यासाठी बारामती येथील रुग्णालया दाखल करण्यात आले होते. बारामतीच्या डॉक्टरांनी या मुलावर यशस्वी शास्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवले आहेत.

सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करायला गेलेल्या दोन वर्षाच्या युवराज राठोड या चिमुकल्यावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या या मुलाला बारामती शहरातील श्रीपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील डॉक्टर राजेंद्र मुथा, डॉक्टर सौरभ मुथा, डॉक्टर आशुतोष आटोळे यांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवले आहेत. या मुलाच्या शरीरावर 55 टाके टाकण्यात आले आहेत.

हे ही वाचा : श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये अन् आफताब दुसऱ्याच मुलीसोबत राहत होता घरात

कुत्रा चावल्यास काय करावे?

पाळीव कुत्र्यांनी लोकांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतल्याच्या काही घटना अलिकडे सोशल मीडियावरूनही व्हायरल झाल्या. नोएडात लिफ्टमध्ये एका मुलाला कुत्रा चावला आणि अशीच घटना एका डिलिव्हरी बॉयसोबतही घडली. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्या तरी गेल्या काही काळापासून पाळीव कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.

कुत्रे मुलांवर खूप लवकर हल्ला करतात. तज्ज्ञांच्या मते, कुत्रा चावल्याने लोकांना रेबीजसारखे गंभीर आजार होऊ शकतात. गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी, लोकांनी कुत्रा चावल्यानंतर लगेच प्रथमोपचार करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : कुठे तंदुरमध्ये जाळलं, तर कुठे शरिराचे केले तुकडे, देशातील 5 अंगावर शहारे आणणारे हत्याकांड

तज्ञ काय म्हणतात?

हॅरी पेट्स क्लिनिक आणि सर्जरी सेंटर, यमुना विहार, नवी दिल्लीचे डॉ. हरवतार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यामुळे लोकांना रेबीज आणि इतर झुनोटिक रोगांचा धोका असतो. कुत्रे, मांजरी आणि माकडे रेबीजचा लासा विषाणू वाहून नेतात, जो लाळेद्वारे मानवांमध्ये पसरतो. महत्त्वाचे म्हणजे पाळीव कुत्रा चावल्याने देखील गंभीर आजार होऊ शकतात. कुत्रा चावल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. प्रथमोपचारानंतर लोकांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत.

First published:

Tags: Baramati, Crime news, Dog