मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुणे जिल्ह्यात मोराच्या पिल्लाला इन्केब्युटरद्वारे मिळालं जीवदान, नेमकी काय आहे घटना? वाचा स्पेशल रिपोर्ट

पुणे जिल्ह्यात मोराच्या पिल्लाला इन्केब्युटरद्वारे मिळालं जीवदान, नेमकी काय आहे घटना? वाचा स्पेशल रिपोर्ट

पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावात हा प्रकार घडलाय. लांडोरीच्या पिल्लांना इनक्यूबेटरद्वारे जीवदान देण्याची कदाचित देशातील पहिलीच घटना असावी.

पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावात हा प्रकार घडलाय. लांडोरीच्या पिल्लांना इनक्यूबेटरद्वारे जीवदान देण्याची कदाचित देशातील पहिलीच घटना असावी.

पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावात हा प्रकार घडलाय. लांडोरीच्या पिल्लांना इनक्यूबेटरद्वारे जीवदान देण्याची कदाचित देशातील पहिलीच घटना असावी.

    पुणे, 4 नोव्हेंबर : पुरंदर तालुक्यातील पिंगळी गावातील (Pigali village of Purander Taluka) एका शेतात शेतकरी सुरेश शिंदे (Farmer Suresh Shinde) यांना बांधावर लांडोरीची अंडी सापडली होती. ही अंडी शिंदे यांनी पिंगोरी गावातील इला फाऊंडेशन कडे आणून दिली. त्यानंतर या अंड्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं. आणि काही दिवसांनी या अंड्यातून गुटगुटीत अशी पिल्ले बाहेर आली. अशाप्रकारे लांडोरीची पिल्लं इनक्यूबेटरद्वारे बाहेर येणे ही देशातील पहिलीच घटना असल्याची शक्यता आहे. (artificial incubator of Indian peahen eggs)

    इला फौंडेशनद्वारे या पिल्लांची काळजी घेतली जात आहे. या फौंडेशनच्या आवारातच ही पिल्लं वाढत आहेत. खरं तर एकदा का अंड्याना माणसांचा हात लागला की लांडोर देखील त्यांना सांभाळत नाही. ती अंडी नष्ट करून टाकते. परंतु या अनोख्या प्रयोगाद्वारे त्या पिल्लांना जीवदान मिळालं आहे.

    वाचा : राज्यातील प्राणी संग्रहालयात तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू

    खरंतर लांडोरीच्या अंड्यांना योग्य तापमान गरजेचं असतं. अन्यथा ती अंडी निकामी होतात, म्हणून ही अंडी उबवण्यासाठी इला फाऊंडेशनने एका तासात इन्क्युबेटर तयार केले. त्यात ही अंडी ठेवली. लांडोर या अंड्यांना सतत हलवत असते. त्यामुळे अंडी हलवण्याचा काम सतत करावं लागत होतं. त्यानंतर सोळा दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर या अंड्यातून सुदृढ अशी पिल्लू बाहेर आले.

    यापूर्वी कोबंडीची अंडी इनक्युबेटरमध्ये उबवून पिल्लं जन्माला घातली जायची शेकडो पोल्ट्री फॉर्ममधून अशी अंडी उबवनी केंद्र आजही कार्यरत आहेत. त्यात नवीन काहीच नाही पण मोराचं पिल्लू अर्थात लांडोरच्या इवलसं पिल्लू इनक्युबेटरमध्ये ठराविक तापमानाला उबवून एका पिल्लाला आर्टिफिशियली जम्नाला घालण्याची ही कदाचित पहिलीच घटना असा संबंधितांचा दावा आहे.

    वाचा : पुण्यातील नामांकित सराफांना गंडा; CCTV च्या मदतीने महिला अटकेत

    अर्थात या क्षेत्रातले जाणकार यावर निश्चितच अधिकारवाणीने भाष्य करू शकतील पण सध्यातरी पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावात इनकेब्युटरमधून जन्माला घातलेलं पिल्लू सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरलाय. आजुबाजुच्या गावचे लोकही आवर्जून हे मोराचं हटके पद्धतीने जन्माला आलेला पिल्लू बघण्यासाठी पिंपरी गावाला भेटी देऊ लागले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Pune