बुधवारी रात्रीपासून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले. कोणी हार घालून, कोणी पाय धुवून, तर कोणी विविध वारकरी पोषक परिधान करून त्यांचे स्वागत केले. मार्केट यार्डात सुमारे 150-200 दिंड्यांच्या माध्यमातून सुमारे 20 हजार वारकऱ्यांनी काल पुण्यात मुक्काम केला. त्यामुळे संपूर्ण मार्केट यार्डात भक्तिमय वातावरण झाले होते. हे वाचा - VIDEO : माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना आळंदी येथून मंगळवारी प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा गांधी वाडा येथील आजोळघरी मुक्काम होता. तेथून सकाळी पालखीचे पुण्याकडे मार्गक्रमण झाले, तर आकुर्डी येथील तुकाराम महाराज यांची पालखीने पुण्याकडे मार्गस्थ झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दुपारी कळस येथे आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. बोपोडी येथील हॅरिस पुलाजवळ संत तुकाराम महाराज यांची पालखी पोहोचताच अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि सहआयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.#PuneMetro पुणे मेट्रोत घुमला टाळ-मृदुंगांचा गजर... पुणे मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांनी काल मेट्रो सफरीचाही आनंद लुटला... गरवारे ब्रिज ते वनाज असा वारकऱ्यांनी मेट्रोतून प्रवास केला. #Palkhi #AshadhiWari pic.twitter.com/nQmLaMP3d9
— News18Lokmat (@News18lokmat) June 24, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune metro