मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'माझ्या हेलिकॉप्टरच्या आवाजात फरक जाणवला, आणि...', अजित पवारांनी महिला पायलटचा किस्सा सांगितला

'माझ्या हेलिकॉप्टरच्या आवाजात फरक जाणवला, आणि...', अजित पवारांनी महिला पायलटचा किस्सा सांगितला

महिलांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यासोबत घडलेला महिला पायलटचा (Woman Pilot) एक किस्सा सांगितला.

महिलांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यासोबत घडलेला महिला पायलटचा (Woman Pilot) एक किस्सा सांगितला.

महिलांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यासोबत घडलेला महिला पायलटचा (Woman Pilot) एक किस्सा सांगितला.

पुणे, 30 नोव्हेंबर : महिला (Women) आपल्या कामात प्रामाणिक (Sincere) असतात. ते प्रत्येक काम प्रामाणिकपणासह चोखपणे पार पाडतात, अशा शब्दात उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिलांचं कौतुक केलं. त्याचबरोबर महिलांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना अजित पवार यांनी आपल्यासोबत घडलेला महिला पायलटचा (Woman Pilot) एक किस्सा सांगितला. आपल्या हेलिकॉप्टरमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता. तो बिघाड त्या महिला पायलटने थेट आवाजावरुन हेरला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यात जिल्हा परिषदेकडून अंगनवाडी सेविका पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांनी महिला पायलटचा नेमका काय किस्सा सांगितला?

"महिला आपल्या कामात प्रॉम्ट असतात. माझ्या हेलिकॉप्टरच्या आवाजात थोडासा फरक जाणवताच महिला पायलटने लगेच खाली उतरुन दुरुस्त केली. तिथंच जर एखादा गडी असता तर माहित नाही काय झालं असतं", असा किस्सा अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा : मोठी बातमी ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

'अंगणवाडी सेविकांनी कोरोना योद्धा म्हणून मोठं योगदान दिलं'

"आदर्श पुरस्कार मिळणाऱ्या सर्व अंगनवाडी सेविकांचे हार्दिक अभिनंदन ! महिला बाल कल्याण विभागातर्फे 45 अंगणवाडी सेविकांना हा पुरस्कार दिला जातोय. पुरस्काराने तुमच्या कामाचा हुरुप वाढतोय, इतरांनाही या कार्यक्रमातून प्रेरणा मिळेल. इतरांनाही पुढच्यावेळी हा पुरस्कार मिळावा, असं काम करा. तर पुरस्कार मिळालेल्यांनीही लगेच आता झालं म्हणून निवांत होऊ नका. यापुढेही चांगलं काम करत राहा. अंगणवाडी सेविकांनी कोरोना योद्धा म्हणून मोठं योगदान दिलं, याची शासनाने नोंद घेतलीय. सुरुवातीला अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळायचे. तरीही त्या काम करत राहिल्या", असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : राज्याला मिळाले नवीन मुख्य सचिव, देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती

'कोरोनाच्या नवा व्हेरियंटचा धोका संभवतोय'

"शासनाचा कारभार लोकाभिमुख होण्यात तळागाळातील कर्मचाऱ्यांचा हातभार खूप महत्वाचा असतो. कोरोनाचा काळ कसा गेला तो सर्वांनी पाहिलंय. आताही नवा व्हेरियंटचा धोका संभवतोय. म्हणूनच अंगणवाडी सेविकांनी मास्क वापरासाठी पुढाकार घ्यावा. महिला आरक्षणाचा निर्णय राबवताना त्यावेळी कार्यकर्त्यांनी खूप आढेवेळे घेतले होते पण चित्र बदललं आहे. काहीजण स्वत:ला सेवक म्हणून घेतात पण प्रत्यक्षात मात्र तसं वागत नाहीत. महिलांचं मात्र तसं नसतं. त्या प्रामाणिकपणे काम करत राहतात", अशा शब्दांत अजित पवारांनी महिलांचं कौतुक केलं.

'ओमायक्रोनमुळे 15 डिसेंबरपर्यंत शाळा बंद'

"कोरोनाचा ओमायक्रोन हा नवा व्हेरिएंट जगात तीव्र गतीने फैलावतोय. त्यामुळे मुंबई आणि इतर ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत शाळा उघडू नये, असं ठरवण्यात आलं आहे. तसेच इतर ठिकाणी स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यामध्ये जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी पुण्यात केली जाईल. गेल्या चार दिवसात विषाणू संदर्भात अनेक केसेस वाढलेल्या आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी कार्यक्रम संपल्यानंतर प्रतिनिधींना दिली.

First published: