मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा 'सर्जाराजा'चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO

महाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा 'सर्जाराजा'चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO

अजित दादांचं हेच ते वेगळेपण, सर्जाराजाचे मानले आभार

अजित दादांचं हेच ते वेगळेपण, सर्जाराजाचे मानले आभार

अजित पवारांनी आज बैलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांचे बैलपोळाच्या पूजेचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये त्यांच्या स्वभावातला साधेपणा खुलून दिसतोय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

बारामती, 25 सप्टेंबर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभाव आणि डॅशिंग कार्यपद्धतीमुळे ओळखले जातात. अजित दादा एखाद्या भागाचा पाहणी दौऱ्यासाठी गेले आणि त्यांना प्रशासनाचा कुठे हलगर्जीपणा दिसला तर ते अधिकाऱ्यांना भर गर्दीत धारेवर धरतात. अजित पवार यांनी नुकतंच रात्री उशिरा विकास कामांचा पाहणी दौरा केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. याशिवाय अजित पवार पहाटे लवकर उठून राज्याच्या विकासासाठी काम करत असतात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांनी अनेक तरुणांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे. अजित पवार हे जितके डॅशिंग आहेत तितकेच ते हळवे देखील आहेत. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांना स्थानिक पातळीवर जाऊन मदत केल्याचे अनेक किस्से आहेत.

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची मातीशी नाळ ही घट्ट असते, असं मानलं जातं आणि ते अगदी खरंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाच्या स्थानावर असलेल्या या नेत्याने आज अतिशय साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबासह बैलपोळा सण साजरा केला. अजित पवारांनी आज सर्जाराजाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांचे बैलपोळाच्या पूजेचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये त्यांच्या स्वभावातला साधेपणा खुलून दिसतोय.

आयुष्यात मित्र असणं फार गरजेचं असतं. मित्रांशिवाय जगणं जगणं नसतं. मित्र खूप मोठा आधार असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र असतो. आयुष्याच्या प्रवासात कुठल्यान कुठल्या टप्प्यावर मित्र भेटतात. तसे मित्र तर भरपूर असतात. पण सगळीच सारखे नसतात. काही आपल्यासाठी खास असतात. शेतकऱ्यांच्या आयुष्यातही एक मित्र खास असतो. तो त्याच्या आयुष्यभराचा दोस्त, साथीदार, जोडीदार कुटुंबातला सदस्य, अगदी सारं काही असतो. हा मित्र निस्वार्थी असतो. आणि तो मित्र म्हणजे बैल असतो. शेतकरी जितकं प्रेम बैलांना देतात त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रेम ते शेतकऱ्याला देतात. त्यामुळे या मैत्रीची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, असं म्हणतात. याचीच जाणीव महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील आहे. त्याच जाणीवेतून त्यांनी आज कुटुंबासह बैलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

राज्यात आज सर्वत्र भाद्रपती बैलपोळा साजरा केला जातोय. या निमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी सर्व कुटुंबासह एकत्र येत बैलपोळा सण साजरा केला. यावेळी अजित पवार, त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या आई आशाताई पवार, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि त्यांच्या वहिनी शर्मिला पवार उपस्थित होत्या. यावेळी पारंपारिक बैलपोळा सण साजरा करून नैवेद्य म्हणून पुरणपोळी बैलांना भरवण्यात आली.

('एक घाव, दोन तुकडे केले असते, पण...', शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया)

बैलपोळ्याची पूजा संपन्न झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "काटेवाडी येथे बैल पोळा सणाच्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झालो. बळीराजासोबत शेतात राबणारा बैल हा त्याचा खरा सवंगडी. आज संपन्न झालेल्या पूजेच्या माध्यमातून या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

First published: