Home /News /maharashtra /

आधी दारू पाजली अन् नंतर दिले खदानीत ढकलून, पुण्यातील दुहेरी खुनाचा अखेर उलगडा

आधी दारू पाजली अन् नंतर दिले खदानीत ढकलून, पुण्यातील दुहेरी खुनाचा अखेर उलगडा

लंके याची एक मानलेली बहीण असून तिचे रोहीत डोंगरे नावाच्या तरुणाशी प्रेमसबंध होते. मात्र, तिला आकाश वाघमारे नावाचा तरूण त्रास देत होता.

लंके याची एक मानलेली बहीण असून तिचे रोहीत डोंगरे नावाच्या तरुणाशी प्रेमसबंध होते. मात्र, तिला आकाश वाघमारे नावाचा तरूण त्रास देत होता.

लंके याची एक मानलेली बहीण असून तिचे रोहीत डोंगरे नावाच्या तरुणाशी प्रेमसबंध होते. मात्र, तिला आकाश वाघमारे नावाचा तरूण त्रास देत होता.

पुणे, 19 जून : मागील आठवड्यात पुण्यातील (pune) विश्रांतवाडीच्या खदानीमध्ये दोन जणांचे मृतदेह (double murder case ) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. जुन्या वादातून आणि  मानलेल्या बहिणीला त्रास का देता म्हणून जाब विचारल्याच्या रागातून दोघांना खदाणीमध्ये ढकलून खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  7  जून रोजी विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहणारे विकी नानाभाऊ लंके (20) आणि सुशांत गडदे  (20) हे दोघेजण बेपत्ता झाले होते. या दोघांची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली होती. मात्र चार दिवसांनी दोघांचे मृतदेह विश्रांतवाडीतील पाण्याच्या खदाणीमध्ये आढळून आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बेपत्ता झाले होते त्या दिवशी दोघेही  प्रसन्न थुल उर्फ गोट्या (वय.21,रा. पंचशिलनगर)आणि अनिकेत उरणकर उर्फ हुर्‍या (वय.24,रा. औंध रोड) या दोघांसोबत होते.  खून झालेले लंके, बडदे आणि त्यांचा खून करणारे उरणकर, प्रसन्न थुल  हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यातील लंके हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तर, आरोपी देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. लंके याची एक मानलेली बहीण असून तिचे रोहीत डोंगरे नावाच्या तरुणाशी प्रेमसबंध होते. मात्र, तिला आकाश वाघमारे नावाचा तरूण त्रास देत होता. आकाश त्रास देत असल्याची तक्रार तरूणीने डोंगरे याच्याकडे केली होती. रोहीत आणि लंके मित्र असल्याने आणि लंकेची ती मानलेली बहीण असल्याने त्याने आकाशला जाब विचारला तसेच त्याला शिवीगाळ केली होती. आकाश आणि अनिकेत उरणकर हे दोघे मित्र असल्याने तरुणीच्या कारणातून लंके याने शिवीगाळ केल्याने उरणकर आणि लंके यांच्यात वाद झाला होता. (Elecric Scooters: भारतीयांना वेड लावणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; जाणून घ्या) त्यानंतर मंगळवारी 7 जूनच्या रात्री उरणकर यानेच थूलला सोबत घेऊन लंके आणि गडदे यांना दारू पाजली. चौघेजण मिळून रात्री साडेतीनवाजेपर्यंत दारू प्यायले. दारू पिल्यानंतर चौघेही  गप्पा मारत खदाणीच्या जवळ गेले. त्याठिकाणी उरणकर याने लंकेशी वाद घालत त्याला हाताने मारहाण केली. मारहाणीनंतर त्याला काठावरून खदाणीमध्ये ढकलून दिले. लंके खाली पडल्यानंतर बडदे याने आरोपीला विरोध केला. दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यालाही खदाणीमध्ये ढकलून दिले होते.  या प्रकरणी पोलिसांनी  प्रसन्न थुल उर्फ गोट्या आणि अनिकेत उरणकर उर्फ हुर्‍या दोघांना अटक केली आहे. (अफगाणिस्तानातील शिखांच्या मदतीला भारताची धाव, केंद्र सरकार देणार खास सवलत) पोलीस उपायुक्त रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, विजय शिंदे, उपनिरीक्षक लहू सातपुते, कर्मचारी दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, संदीप देवकाते, संपत भोसले यांच्या पथकाने कौशल्यपुर्वक तपास करून खूनाचा छडा लावला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या