मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /डोंबिवलीनंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, राज्याची चिंता वाढली

डोंबिवलीनंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, राज्याची चिंता वाढली

त्यामुळे महाराष्ट्रात आणखी 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात आणखी 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात आणखी 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

पुणे, 5 डिसेंबर : डोंबिवलीत ओमायक्रॉनचा (Omicron cases in Maharashtra) रूग्ण आढळल्यानंतर आता पुणे-पिंपरी-चिंचवड मधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथून ओमायक्रॉनचे नवे 6 रुग्ण समोर आलं आहेत. त्याशिवाय पुण्यातील एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात सापडलेला रुग्ण हा फिनलँडहून आल्याचं सांगितलं जात आहे. (After Dombivali Omaicron cases in Pune and Pimpri Chinchwad increased the concern of the state)

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील तीन रूग्ण हे नायजेरियातून आलीची माहिती उघड झाली आहे.

विशेष म्हणजे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अधिकतर लसीकरण झालेले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड येथील नायजेरियातून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात येथील तिघेजण आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

First published:
top videos