पुणे, 28 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) वडगाव शेरी परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या प्रियकरासह अन्य एका तरुणाने बलात्कार (rape on minor girl) केला आहे. पीडित मुलगी आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना, अन्य एका तरुणानं त्यांचा अश्लील व्हिडीओ (Shoot obscene videos) आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तरुणाने देखील पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आहेत.
आरोपी तरुण प्रेयसीवर बलात्कार करत असताना, प्रियकर तरुणाने बलात्काराचा व्हिडीओ बनवला आहे. एवढंच नव्हे तर आरोपी प्रियकराने संबंधित व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवून तिची बदनामी देखील केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, पीडित अल्पवयीन मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात प्रियकरासह अन्य एका तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा- 2 वर्षीय चिमुकलीला कपाटात कोंडून दिल्या नरक यातना; औरंगाबादेतील संतापजनक घटना
अमित अबदेश यादव (वय- 18) आणि धनंजय नामदेव रोकडे (वय- 38) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित याचे पीडित मुलीसोबत 2019 पासून प्रेमसंबध सुरू होते. दरम्यान, 4 ऑगस्ट 2021 रोजी आरोपी अमित पीडितेला वडगाव शेरी येथील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवले.
हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग
यावेळी या इमारतीत आलेल्या धनंजय रोकडे याने दोघांचा शारीर संबंधाचा व्हिडीओ काढला. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, धनंजयनेही पीडित मुलीवर बलात्कार केला. यावेळी आरोपी धनंजय प्रेयसीवर बलात्कार करत असताना, प्रियकर अमितने संबंधित प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. यानंतर अमितने हा व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवून पीडित मुलीची बदनामी केली आहे. याप्रकरणी पीडितेनं येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Rape on minor