पुणे, 30 नोव्हेंबर : शाळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. कारण सर्वांच्या आयुष्यात शाळा आणि शिक्षक ही खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. काही जण मग स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात. असाच एक प्रकार पुण्यातील एका शाळेत पाहायला मिळाला.
हा अनोखा प्रकार काय -
पुण्यातील उरळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचं अनोखं स्नेहसंमेलन पार पडलं. 1994 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या स्नेहसंमेलनाची सर्वत्र चर्चा होत आहे. 28 वर्षांपूर्वीची बॅच उरळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालयात एकत्र आली. यावेळी त्यांचे अनोखे रुप पाहायला मिळाले.
यावेळी माजी विद्यार्थी त्याच शाळेच्या गणवेशात आणि पाठीवर दप्तर घेऊन पाहायला मिळाले. यावेळी तोच वर्ग, आणि तोच काळ्या रंगाचा फळा, तास सुरू झाले. यावेळी हेच 1994 च्या बॅचचे विद्यार्थी मूळ विद्यार्थी स्वरुपात पाहायला मिळाले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांसहीत नेटकरीदेखील भूतकाळातील शालेय जीवनात रमले.
हेही वाचा - What are Your Salary Expectations? प्रश्नामुळे गोंधळून जाऊ नका; असं द्या परफेक्ट उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.