Home /News /maharashtra /

Pune : विद्यार्थ्यांनो, 'या' कोर्समध्ये शिक्षण घेत चांगलं कमवताही येतं; SPPU ने सुरू केलाय नवा कोर्स, असा घ्या प्रवेश

Pune : विद्यार्थ्यांनो, 'या' कोर्समध्ये शिक्षण घेत चांगलं कमवताही येतं; SPPU ने सुरू केलाय नवा कोर्स, असा घ्या प्रवेश

बी.व्होक च्या सर्व विद्यार्थ्यांना 'शिक्षणासोबच अर्थार्जनाची संधी

बी.व्होक च्या सर्व विद्यार्थ्यांना 'शिक्षणासोबच अर्थार्जनाची संधी

औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण बऱ्याचदा नोकरीच्या शोधात बाहेर पडतो. पण, SPPU ने 'हा' असा कोर्स सुरू केला आहे की, ज्यामधून तुम्ही एकीकडे शिक्षणही घेत असता आणि दुसरीकडे चांगल्या कंपनीमध्ये पैसेहा कमवित असता. तर या कोर्संमध्ये कसा प्रवेश घ्याल, याची माहिती घेऊ.

पुढे वाचा ...
    पुणे, 2 जुलै : विद्यार्थ्यांना शिक्षण घेत कामही करता यावे, त्यांच्या कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करत नवीन 'बी व्होक इन रिटेल मॅनेजमेंट' हा अभ्यासक्रम 2021-22 पासून सुरू केला आहे. यामुळे एकीकडे विद्यार्थी शिकत आहेत, तर दुसरीकडे पैसेही कमवित आहेत. तर या कोर्सबद्दल माहिती जाणून घेऊ... (Admission of B Voc course started in SPPU) वाचा : Nashik Leopard Video : बिबट्यानं घेतला घराच्या बाल्कनीचा ताबा, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण "बी. व्होक इन रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये 23 विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. या पदवी अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या वर्षी पूर्ण वेळ वर्गात, तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी काम करत शिकण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना महिना 8 हजार रुपये, त्यासोबतच भत्ताही देण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना ९ हजार रुपये व भत्ता देण्यात येणार", अशी माहिती कौशल्य विकास केंद्रातील प्राध्यापक डॉ. आहुजा यांनी सांगितले. कोर्ससंबंधी अधिक माहिती B.Voc in Retail Management असे या कोर्सचे नाव आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान कोर्सच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून 8000 आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना 9000 दरमहा स्टायपेंड दिली जाते. या कोर्सबरोबर B.voc in Renewable Energy आणि B.Voc in Manufacturing Skills हेदेखील कोर्स आहेत. हे सर्व कोर्सेस व्यवसाय आधारित असून या विषयी सविस्तर माहिती पुणे विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. या कोर्ससाठी कसा प्रवेश घ्याल? यंदाच्या वर्षीची बी.व्होक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर देण्यात आली आहे. https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या लिंकवर प्रवेश अर्ज भरता येतो. गणेशखिंड रोड, गणेशखिंड, पुणे, महाराष्ट्र 411007 या पत्त्यावर भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतो. ccep@pun.unipune.ac.in या ईमेलवर किंवा 020-25621227 फोन नंबरवर संपर्क करू शकता.
    First published:

    Tags: Education, Pune

    पुढील बातम्या