गुगल मॅपवरून साभार...
"विठ्ठलाची ही मुर्ती बनविण्याकरिता प्रत्येकी 40 किलो वजनाची तब्बल 200 शाडूच्या मातीची पोती लागली. तर, दीड हजार किलो वजनाचा लोखंडी सांगाडा वापरण्यात आला. तसेच यात पूर्णपणे फायबर वापरण्यात आले आहे. यामुळे ही मूर्ती हवा, पाणी आणि इतर कोणत्याही वातावरणात खराब होणार नाही. 10 फुटी चौथाऱ्यावर मूर्ती स्थापन केल्यानंतर बाजूला पेटी, तबला, वीणा, डगा ही वारकऱ्यांची वाद्यंही लावण्यात येणार आहे. तसेच 25 फुटांवर ही मुर्ती विठ्ठलाची मुर्ती उभी राहणार आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागला, अशी माहिती शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी यावेळी दिली. विनोद यांनी बनवलेली ही पहिलीच सर्वात मोठी मुर्ती आहे. त्यांचा स्वतःचा कारखाना आहे, त्यामुळे ते जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे मूर्ती बनवून देतात. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी 9822924422 हा मोबाईल नंबर आहे, तर ई-25, प्रसाद पार्क, सिंहगड रोड, विठ्ठलवाडी, पुणे, महाराष्ट्र 411051 आपण पत्त्यावर भेट देऊ शकता. वाचा : महामिनिस्टरच्या निमित्तानं अभिनेत्री 15 वर्षांनी भेटली आदेश भावोजींना; ‘देवमाणूस 2’मध्ये साकारतेय खास भूमिका यापुर्वीदेखील विनोद येलापूरकर यांनी बनवलेल्या अनेक मुर्ती पुण्यातील महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या आहेत. ही मूर्ती दोन भागांमध्ये बनवली गेलेली आहे. विठ्ठलाच्या कमरेवरचा पहिला भाग मुर्तीकारांनी आपल्या घरी बनवला. हा भाग उन्हाळ्यामध्ये बनवला लागला असून उर्वरित भाग शाडूच्या मूर्ती पासून बनवलेला आहे. सध्या त्यामध्ये आता फायबरचे काम सुरू आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून ही मुर्ती साताऱ्याकडे पाठवण्यात येणार आहे. या मुर्तीचे दर्शन घ्यायलादेखील लोक सध्या येत आहेत. विनोद यांना मूर्तीकलेचा चांगला अनुभव असून यांनी आपल्या कलेच्याद्वारे विठ्ठलाला आपली सेवा अर्पण केली आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Pune, Wari