मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune: आई-वडिलांचं छत्र हरवताच साधला डाव; अल्पवयीन पुतणीवर काकाचा 3 वर्षे अत्याचार

Pune: आई-वडिलांचं छत्र हरवताच साधला डाव; अल्पवयीन पुतणीवर काकाचा 3 वर्षे अत्याचार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape in Pune: पुण्यातील वडगाव परिसरातील चरवड येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका अनाथ 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने अत्याचार (Uncle raped minor niece) केला आहे.

पुणे, 28 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) वडगाव परिसरातील चरवड येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका अनाथ 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने अत्याचार (Uncle raped minor niece) केला आहे. पीडित मुलीच्या आई वडिलांच्या निधनानंतर सांभाळ करणाऱ्या काकानेच पुतणीसोबत हा गैरप्रकार केला आहे. नराधम आरोपीनं गेल्या तीन वर्षांपासून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. अखेर तिने संबंधित प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेला सांगितल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

सिंहगड पोलिसांनी 49 वर्षीय आरोपी काकाला अटक (Accused uncle arrested) केली आहे. आरोपी गेल्या तीन वर्षांपासून 9 वर्षीय पुतणीचं लैंगिक शोषण करत होता. हा संतापजनक प्रकार 13 डिसेबर 2018 पासून 25 नोव्हेबर 2021 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. वडिलांच्या निधनानंतर, पीडित मुलगी, तिचा 12 वर्षांचा भाऊ आणि आई काकासोबत राहू लागले. दरम्यान वडिलांच्या मृत्यूनंतर काकीचाही मृत्यू झाला आणि दोन वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आईचंही निधन झालं.

हेही वाचा- प्रेयसीवर बलात्कार करत होता तरुण अन् प्रियकर बनवत राहिला VIDEO, पुण्यातील धक्कादायक घटना

त्यामुळे 9 वर्षाची पीडित मुलगी आणि तिचा 12 वर्षांचा भाऊ दोघंही अनाथ झाले. काका हेच दोघांचा एकमेक आधार होता. दोघंही आपल्या काकाकडे राहू लागले. पण काकाची आपल्या पुतणीवर वाईट नजर होती. आरोपी काकानं अनाथ पुतणीवर सर्वप्रथम 13 डिसेबर 2018 रोजी बलात्कार केला. तसेच घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या भावाला जीवे मारेल, अशी धमकी आरोपीनं पीडितेला आणि तिच्या भावाला दिली. त्यामुळे दोघांनीही या घटनेबाबत कोणालाच काही सांगितलं नाही.

हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग

यानंतर आरोपीनं पीडित मुलीचं लैंगिक शोषण करण्याचा धडाकाच लावला. आरोपीनं पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे. दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीला प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या महिलेकडे केली आणि तिला त्रास होत असल्याचं सांगितलं. यानंतर संबंधित महिलेनं पीडितेला विश्वासात घेत विचारलं असता तिने सर्व प्रकार शेजारी राहणाऱ्या महिलेला सांगितला आहे. या घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या महिलेनं पीडित मुलीला घेत सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape on minor