मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुणे हादरलं! 7 वर्षीय पुतणीसोबत काकाचं घृणास्पद कृत्य, 4 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

पुणे हादरलं! 7 वर्षीय पुतणीसोबत काकाचं घृणास्पद कृत्य, 4 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या मांजरी याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या 7 वर्षीय पुतणीला वासनेचा शिकार बनवलं (Minor niece raped by uncle) आहे.

पुणे, 12 डिसेंबर: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या मांजरी (Manjari) याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 7 वर्षीय पुतणीला वासनेचा शिकार (Minor niece raped by uncle) बनवलं आहे. नराधम आरोपी गोड बोलून मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. तसेच घटनेच्या वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारेल, अशी धमकीही आरोपीनं पीडितेला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीनं या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही.

पण अलीकडेच आरोपीनं पीडित मुलीचं लैंगिक शोषण केल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. पीडित मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईनं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत, आपल्या दीराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो कलमासह (POCSO Case) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे.

हेही वाचा-लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्याजवळील मांजरी येथील एका सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहते. आरोपी काकाने 7 वर्षीय पीडित मुलीला गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. जून ते 6 डिसेंबर 2021 पर्यंत हा धक्कादायक प्रकार सुरू होता. घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारेल, अशी धमकी आरोपीनं दिली होती.

हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

त्यामुळे पीडित मुलगी नराधम काकाचा लैंगिक अत्याचार निमूटपणे सहन करत होती. पण पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape on minor