Home /News /maharashtra /

तो झोका ठरला शेवटचा; आईच्या डोळ्यादेखत 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील हृदयद्रावक घटना

तो झोका ठरला शेवटचा; आईच्या डोळ्यादेखत 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील हृदयद्रावक घटना

आईच्या डोळ्यादेखत या चिमुकल्याचा मृत्यू झाला (6 Years Old Boy Died in Accident in Pune). युवान दौंडकर असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.

    पुणे 07 जुलै : मृत्यू कधी, कसा आणि कुठे येईल हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा आपल्याला समोरच्या संकटाची कल्पनाही येत नाही आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. पिंपरी चिंचवडमधून सध्या एक अशीच घटना समोर आली आहे. यात एका सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईच्या डोळ्यादेखत या चिमुकल्याचा मृत्यू झाला (6 Years Old Boy Died in Accident in Pune). युवान दौंडकर असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. अभ्यास केला नाही म्हणून पालकांनी केली बेदम मारहाण, 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू या घटनेत युवानची आई वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी थांबलेली होती. यावेळी त्या शेजारीच असलेल्या गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात युवानसह बसल्या होत्या. तर युवान तिथल्या लोखंडी रॉ़डवर ठेवलेल्या ग्रँडर मशीनसोबत झोका खेळत होता. इतक्यात अचानक हे मशीन त्याच्या तोंडावर पडलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या मशीनचं वजन साधारण २० ते ३० किलो असल्याची माहिती दुकानातील कामगारांनी दिली. ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवान त्याच्या आईसह वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची आई शेजारीच असलेल्या स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानातील खुर्चीवर बसली होती. तर युवान तिथेच शेजारी खेळत होता. यावेळी त्याने तिथे लोखंडी रॉडवर ठेवलेल्या मोठ्या ग्रँडर मशीनला झोका खेळण्याचा प्रयत्न केला. IAS अधिकाऱ्याकडून IIT च्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल कृत्य, पार्टीला बोलावून साधला डाव झोका खेळण्याचा हा प्रयत्न युवानच्या जीवावर बेतला. हे मशीन थेट युवानच्या तोंडावर पडलं. मशीनचं वजन इतकं जास्त होतं की युवान जागीच बेशुद्ध झाला. यानंतर त्याच्या आईने त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिलीय.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pune crime news, Shocking news

    पुढील बातम्या