मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune: किरकोळ कारणातून मालकाची सटकली; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घेतला कामगाराचा जीव

Pune: किरकोळ कारणातून मालकाची सटकली; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घेतला कामगाराचा जीव

Murder in Pune: पुण्याजवळील (Pune) पिंपरी (Pimpri) याठिकाणी एका मालकानं दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीव घेतला आहे.

Murder in Pune: पुण्याजवळील (Pune) पिंपरी (Pimpri) याठिकाणी एका मालकानं दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीव घेतला आहे.

Murder in Pune: पुण्याजवळील (Pune) पिंपरी (Pimpri) याठिकाणी एका मालकानं दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीव घेतला आहे.

पुणे, 22 नोव्हेंबर: पुण्याजवळील (Pune) पिंपरी (Pimpri) याठिकाणी एका मालकानं आपल्या दारुच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या (Brutal murder of worker) केली आहे. किरकोळ कारणातून कामगाराला अशी भयानक शिक्षा दिल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाच्या फिर्यादीवरून मालकाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मनोहर गलाप्पा डोंगरे असं हत्या झालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मृत डोंगरे हे चिखली येथील भिमशक्तीनगर परिसरातील रहिवासी होते. तर आशिष गवळी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी गवळी याचं भीमशक्तीनगर परिसरात दारू विक्रीचं दुकान आहे. या दारू अड्ड्यावर मृत डोंगरे हे दारू विक्रीचं काम करत होते. दरम्यान डोंगरे यांनी दारुच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी येणाऱ्या काही ग्राहकांना शिवीगाळ केली होती.

हेही वाचा-मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक

दारू प्यायला येणाऱ्या ग्राहकांना शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपी आशिष गवळी याने कामगार मनोहर डोंगरे यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मनोहर यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूला दगडाने मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयावह होती, की डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-सायकल चोरून पळाला चोर; मालकाने अशी घडवली अद्दल, CCTV मध्ये कैद झाली घटना, VIDEO

हत्येची घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत मनोहर डोंगरे यांचा मुलगा सुनील डोंगरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात मालक आशिष गवळी याच्याविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत दारू अड्ड्याचा  मालक आशिष गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder, Pune