मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग...

पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग...

Crime in Pune: पुण्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीनं 13 वर्षीय शाळकरी मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं (minor girl sexually molest) आहे.

Crime in Pune: पुण्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीनं 13 वर्षीय शाळकरी मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं (minor girl sexually molest) आहे.

Crime in Pune: पुण्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीनं 13 वर्षीय शाळकरी मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं (minor girl sexually molest) आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 27 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर (Crime against minor girls) आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. मुंबईत एका वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या (Rape and murder) केल्याची घटना ताजी असतानाच, माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीनं 13 वर्षीय शाळकरी मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं (minor girl sexually molest by 52 years old man) आहे. आरोपीनं पीडित मुलीला नवीन कपडे, खाऊ देण्याचं आमिष दाखवत तिच्यासोबत गैरप्रकार केला आहे.

पीडित मुलीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर, तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईनं त्वरित चंदनगर पोलीस ठाण्यात जात 52 वर्षीय आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. भीमराव शंकर पिंपळे असं अटक केलेल्या 52 वर्षीय आरोपीचं नाव असून तो पुण्यातील लोहगाव परिसरातील रहिवासी आहे. आरोपी व्यक्तीची हा पीडित मुलीशी तोंडओळख आहे.

हेही वाचा-मुंबईत 20 वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद कृत्य; टेरेसवर भयावह अवस्थेत आढळली पीडित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय पीडित मुलगी कोंढवा येथील एका शाळेची विद्यार्थिनी आहे. आरोपी भीमराव याने पीडित मुलीला शाळेच्या गेटवर बोलावून घेतलं होतं. तसेच तिला कारमध्ये बसायला लावून तिला आपल्या फोनवर कॉल करण्यास सांगितलं. तसेच उद्या शाळेत येताना, सायकल घेऊन येऊ नको, वडगाव शेरीच्या शेवटच्या बसस्थानकापर्यंत ये. तेथून मी तुला माझ्या कारमधून शाळेत सोडवतो.

हेही वाचा-समलैंगिक संबंध ठेवण्यास दिला नकार; पिंपरीत तरुणाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

तसेच शाळा सुटल्यानंतर, तुला जेवण करण्यासाठी बाहेर घेऊन जातो. शिवाय नवीन कपडे देखील घेऊन देतो, असं आमिष दाखवलं. यावेळी आरोपीनं पीडितेला अश्लील स्पर्श करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. घरी गेल्यानंतर, पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईनं त्वरित चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Pune