Home /News /maharashtra /

पुुण्यात आणखी एक दुर्दैवी घटना, 5 मैत्रिणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू

पुुण्यात आणखी एक दुर्दैवी घटना, 5 मैत्रिणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू

सह्याद्री स्कुलमधील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर

सह्याद्री स्कुलमधील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर

सह्याद्री स्कुलमधील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर

पुणे, 19 मे - पुणे (pune) जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यात सह्याद्री स्कुलमधील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाटघर धरणात (bhatghar dam pune ) 5 तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रहिवासी असलेला एक ग्रुप भाटघर धरणावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी पाच तरुणींनी धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या. पण, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही तरुणीची बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भाटघर धरणात बुडालेल्या पाच महिलांपैकी चार जणींचे मृतदेह सापडले आहे. खुशबू लंकेश राजपूत(वय. १९, रा बावधन), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप राजपूत (वय २२, दोघीही रा. संतोषनगर हडपसर पुणे) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय २३ रा नऱ्हे, ता.भोर) अशी मृतदेह सापडलेल्या मुलींची नाव आहे. तर मनीषा लखन राजपूत (वय २०, रा संतोषनगर हडपसर पुणे) हिचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. तिच्या मृतदेह शोधकार्य रात्रीपर्यंत सुरू होते. सह्याद्री स्कुलमधील 4 शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू दरम्यान, खेड तालुक्यातील चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची (Sahyadri School of Krishnamurti Foundation) सहल आली होती. चार मुलं चासकमान धरणात बुडाल्याची घटना संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दोन मुले आणि दोन मुली मृत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यातून सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. परीक्षित आगरवाल, तनिषा देसाई, ऋचा दीदी आणि नव्या भोसले अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मात्र सह्याद्री स्कुल ही निवासी शाळा डोंगरावर बंदिस्त स्वरुपात आहे.असं असताना शालेय मुले डोंगर उतरुन खाली धरणावर कशी आली असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा झाल्यावर सगळी माहिती समोर येईल. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या