Home /News /maharashtra /

सह्याद्री स्कुलमधील 4 मुलांचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यात खळबळ

सह्याद्री स्कुलमधील 4 मुलांचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यात खळबळ

यात 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली

यात 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली

यात 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली

खेड, 19 मे : पुणे (pune) जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यात दुर्दैवी घटन घडली आहे.  चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. यात 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (4 school children drown in dam) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची (Sahyadri School of Krishnamurti Foundation) सहल आली होती. चार मुलं चासकमान धरणात बुडाल्याची घटना संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दोन मुले आणि दोन मुली मृत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला) पाण्यातून सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. परीक्षित आगरवाल, तनिषा देसाई, ऋचा दीदी आणि नव्या भोसले अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मात्र सह्याद्री स्कुल ही निवासी शाळा डोंगरावर बंदिस्त स्वरुपात आहे.असं असताना शालेय मुले डोंगर उतरुन खाली धरणावर कशी आली असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा झाल्यावर सगळी माहिती समोर येईल. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. (दक्षिण महाराष्ट्रासाठी पुढचे 3 तास Alert! विजांच्या कडकडाट, वादळी पावसाची शक्यता) ष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सहयाद्री स्कुलमध्ये देशभरातील उच्चभ्रू कुटुंबाची मुले शिकण्यासाठी आहेत. मात्र स्कुलमध्ये कडक सुरक्षा असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे आणि स्कुलची सुरक्षा धोक्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या