मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यापाठोपाठ पिंपरीतील 4 जण झाले Omaicron मुक्त, पण आणखी 4 रुग्ण वाढले!

पुण्यापाठोपाठ पिंपरीतील 4 जण झाले Omaicron मुक्त, पण आणखी 4 रुग्ण वाढले!

पिंपरी चिंचवडमधील 6 ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांपैकी 4 जण बरे झाले आहे. या चारही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील 6 ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांपैकी 4 जण बरे झाले आहे. या चारही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील 6 ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांपैकी 4 जण बरे झाले आहे. या चारही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

पिंपरी चिंचवड, 10 डिसेंबर : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन महाराष्ट्रात (Omicron cases in Maharashtra) हातपाय पसरत आहे. त्यामुळे राज्यात चिंतातूर वातावरण आहे. पण दुसरीकडे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आता बरे होत असल्यामुळे दिलासा मिळत आहे. पुण्यातील रुग्णापाठोपाठ (Omicron cases in Pune)  पिंपरी चिंचवडमधील 6 ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांपैकी 4 जण बरे झाले आहे. या चारही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

पिंपरीमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांचे रिपोर्ट समोर आले आहे. पिंपरीतील आधी सापडलेल्या  6  ओमायक्रोन ग्रस्तापैकी पैकी 4 जण निगेटिव्ह आले आहे. या चारही जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. ४ रुग्ण बरे झाले असले तरी आणखी 4 रुग्णांची वाढ झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 10 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. आज या 10 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून 10 पैकी  4 जणांना ओमायक्रोनची लागण झाली आहे. त्यामुळे या चारही जणांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. जे हायरिस्क संपर्कात आले आहे, त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती.

एनसीबीने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू, नांदेडमध्ये केली होती कारवाई

पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी नायजेरियातील लेगॉस शहरातून आलेली एक 44 वर्ष वय असलेली महिला आणि तिच्या 12 आणि 18 वर्षे वय असलेल्या दोन मुली सोबत तिच्या सहवासात असलेल्या इतर तीन जणांना ओमायक्रॉन व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.  24 नोव्हेंबरला नायजेरियातील लेगॉस शहरातून ही महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या भावाला भेटायला आली होती, त्या दरम्यान एअरपोर्टवर केलेल्या rt-pcr चाचणीत ही महिला आणि तिच्या दोन मुली कोरोनाबाधित असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर अहवाल एनआयवीकडे पाठवले होते, त्यानंतर ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पिंपरीमध्ये एकूण ६ जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले होते.

लपून-छपून कोण पाहतंय तुमचं Facebook Profile? असं तपासा

दरम्यान, दुसरीकडे पुण्यातीलही एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलँड येथे गेला होता. त्यानंतर तो पुण्यात परतला होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणं नसल्यामुळे तो संस्थात्मक क्वॉरनटाईनमध्ये होता. 10 दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून पुढील 7 दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

First published: