मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात 20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना

पुण्यात 20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Rape in Pune: पुण्यातील लोणी काळभोर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणानं घराशेजारी राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार केला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 15 जानेवारी: पुण्यातील (Pune) लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणानं घराशेजारी राहणाऱ्या तरुणीला (Young woman raped by neighbour) हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बहाणा करून तिच्यावर अत्याचार केला आहे. हॉटेलमध्ये जेवण करून परत येत असताना नराधम तरुणानं एका निर्जनस्थळी कार थांबवून पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार (Young woman raped in car) केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पीडित तरुणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करत आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय आरोपी तरुण आणि 20 वर्षीय फिर्यादी तरुणी लोणी काळभारे परिसरातील रहिवासी आहेत. दोघंही एकमेकांच्या घराशेजारी राहतात. दरम्यान 13 जानेवारी रोजी आरोपी तरुणानं पीडित तरुणीला जेवणासाठी बाहेर जाऊ असं सांगितलं होतं.

हेही वाचा-साताऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार

मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा असल्याचंही त्यानं पीडित तरुणीला सांगितलं होतं. शेजारी राहणारा आणि चांगला ओळखीचा असल्याने पीडित तरुणीही त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाली. यानंतर घटनेच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास दोघंही खराडी येथील 'पाजी दा ढाबा' या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले. याठिकाणी जेवण केल्यानंतर दोघंही कारने परत खराडीवरून लोणी काळभोरकडे येऊ लागले.

हेही वाचा- टोळक्यानं अपहरण करत 4 दिवस ठेवलं डांबून अन्..; पुण्याला हादरवणारी घटना

घरी परतत असताना आरोपीनं खराडी ते लोणी काळभोर रस्त्यावरील एका निर्जनस्थळी गाडी थांबवली. याठिकाणी आरोपीनं पीडितेसोबत जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या या घटनेनंतर पीडित तरुणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Pune, Rape