मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कानाचा चावा घेत गॅरेजमधील कामगाराच्या पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, 2 भावंडांच्या कृत्याने पुणे हादरलं

कानाचा चावा घेत गॅरेजमधील कामगाराच्या पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, 2 भावंडांच्या कृत्याने पुणे हादरलं

Crime in Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील दोन भावंडांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अमानुष मारहाण (Inhuman beating) केली आहे.

Crime in Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील दोन भावंडांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अमानुष मारहाण (Inhuman beating) केली आहे.

Crime in Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील दोन भावंडांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अमानुष मारहाण (Inhuman beating) केली आहे.

पुणे, 14 जानेवारी: पुण्यातील (Pune) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील दोन भावंडांनी चार्जर न दिल्याच्या कारणातून एका गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अमानुष मारहाण (Inhuman Beating for not giving charger) केली आहे. आरोपींनी फिर्यादी व्यक्तीच्या कानाला चावा घेत (Bite ear), त्याच्या तोंडावर जेवणातील पातळ भाजी टाकली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादी व्यक्तीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून (attack with screw driver) त्याला गंभीर जखमी केलं आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन भावंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

चंद्रकांत रामदास माने आणि सूर्यकांत रामदास माने असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावांची नावं आहेत. दोन्ही आरोपी भाऊ आंबेगाव येथील भेंडी चौक परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणी धायरी परिसरातील गारमाळ येथील रहिवासी असणाऱ्या 34 वर्षीय अंगद वसंतराव पांचाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीला आणलं नाकीनऊ, Instaवरील तरुणाचा कांड वाचून हादराल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 12 जानेवारी रोजी फिर्यादी पांचाळ हे आपल्या गॅरेजमध्ये काम करत होते. दरम्यान दुपारी साडेचारच्या सुमारास आरोपी भावंडं फिर्यादीच्या गॅरेजमध्ये आले. त्यांनी फिर्यादीकडे मोबाइल चार्जर मागितला. पण पांचाळ यांनी चार्जर दिला नाही. चार्जर न दिल्याच्या कारणातून आरोपी भावंडांचा संताप अनावर झाला. त्यांनी शिवीगाळ करत पांचाळ यांच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा-नाशकात मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा, कारण वाचून लावाल डोक्याला हात

हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी संबंधित भावांनी फिर्यादीच्या पाठीला आणि कानाला जोरदार चावा घेतला. तसेच गॅरेजमधील एका जेवणाच्या डब्ब्यात ठेवलेली भाजी फिर्यादीच्या तोंडावर टाकली.  हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही. नराधम आरोपींनी गॅरेजमधील स्क्रू ड्रायव्हर घेऊन फिर्यादीच्या पाठीत खुपसला. तसेच गॅरेजमधील गाड्या ढकलून देत नुकसान केलं. यानंतर आरोपी सूर्यकांत माने याने हातात दगड घेऊन फिर्यादी आणि गॅरेज मालकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरानंतर पांचाळ यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune