पुणे, 08 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागानं (Maharashtra health department recruitment 2021) मोठा गाजावाजा करत परीक्षा घेतली होती. पण हॉल तिकीटवर झालेल्या चुका आणि पेपर फुटीचा (Health Department Recruitment exam) प्रकार समोर आल्यानंतर संबंधित परीक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या ड गटाचं पेपर फुटी प्रकरण राज्यभर गाजत आहे. ही घटना ताजी असताना पोलीस भरतीच्या परीक्षेतेतील काळाबाजार देखील चव्हाट्यावर आला आहे.
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान (police recruitment exam) काही जणांनी मास्कमध्ये इलेक्ट्रिक यंत्र (electric device in mask) बसवून परीक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी अशाप्रकारे अवैध पद्धतीने परीक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक (2 arrested) केली आहे. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा- आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातूनच तरुणाला अटक
नितीन जगन्नाथ मिसाळ (26) आणि रामेश्वर दादासाहेब शिंदे (24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या पोलीस भरती परीक्षेत हा गैरमार्ग अवलंबला होता. हिंजवडी परिसरातील ब्ल्युरीज पब्लिक स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला होता.
हेही वाचा-लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, काही अंतर जाताच महिलेसोबत घडला भयावह प्रकार
हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आरोपींचे आणखी साथीदार कोण आहेत? त्यांना मदत कोणी केली? पोलिसांनी जप्त केलेल्या मास्कमध्ये मोबाईलचे पार्ट्स कुठून आले आणि अशा प्रकारचा मास्क कोणी बनवून दिला. तसेच अशाप्रकारे आणखी कोणी परीक्षा दिली? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. दोन्ही आरोपींना 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune