पुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष? अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय

पुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष? अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय

लोकसभा निवडणुकीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता.

  • Share this:

पुणे, 22 जुलै : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून नव्या अध्यक्षांचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. अशातच आता पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाने काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा तरुण यासाठी काँग्रेसकडे याबाबत लवकरच पत्रही पाठवणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या पुण्यातील तरुणाचं गजानन होसाळे असं नाव असून तो पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. 'काँग्रेस टिकणं ही देशाची गरज आहे आणि त्यासाठी काँग्रेसला तरुण नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच मी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करत आहे,' असं गजानन होसाळे यानं म्हटलं आहे. पुण्यातील या तरुणाला आता काँग्रेसकडून कसा प्रतिसाद देण्यात येतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. अध्यक्ष म्हणून काँग्रेसची सेवा करता आली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानाची होती. देश आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे, असं ट्विट देखील राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. पण, राहुल गांधी मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले.

भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

First published: July 22, 2019, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading