पतीने पूर्ण केली मृत पत्नीची इच्छा, निधनानंतर अवयवदातून 7 जणांना दिली नवसंजीवनी

पतीने पूर्ण केली मृत पत्नीची इच्छा, निधनानंतर अवयवदातून 7 जणांना दिली नवसंजीवनी

निधनानंतर पतीने पूर्ण केली पत्नीची इच्छा. सर्व स्तरातून होतंय कौतुक.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 19 ऑगस्ट : मनीषा केदार टोकेकर या महिलेचं  काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झालं होतं. तापात चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि मनीषा बेशुद्ध झाल्या. 15 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केलं. 'माझा मृत्यू झाला तर माझे अवयव दान करा', अशी कल्पना मनीषा यांनी आधीच पतीला देऊन ठेवली होती. त्यामुळे मनीषा यांच्या जाण्यानंतर त्यांचे अवयव दान करण्यात आले. त्यातून 7 जणांना जीवदान मिळालं. पुणे ते हैदराबाद हा प्रवास अत्यंत वेगाने करून मनीषा यांचं यकृत गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्यात आलं.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांचं हृदय, दोन्ही डोळे, दोन्ही  मूत्रपिंड (किडनी), यकृत, दान करणं शक्य होतं. पतीकडून अनुमती मिळाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणि झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीने विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवरील वेटिंग लिस्टनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली.

यात महिलेचं यकृत हैदराबादच्या कृष्ण हॉस्पिटलमधल्या रुग्णाला तर हृदय चेन्नई येथील एमजीएम रुग्णालयातील एका रुग्णासाठी पाठवण्यात आलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बरेच पेशंट नेत्रदानाच्या वेटिंग लिस्टवर होते. त्यांच्यापर्यंत मनीषा यांचे डोळे पोहोचले.  ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आली. रविवारी दुपारी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आरती गोखले यांनी दिली आहे.

राज्यात मुसळधार पाऊस सुरूच; या जिल्ह्यात नदीला पूर, गावाचा संपर्क तुटला

या सगळ्या अवयव दानाचा उपयोग वेळेत अवयव दान झाले तरच होतो. हे लक्षात घेता झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर पुणे यांनी अवयव प्रत्यारोपणाला वेळेत पोहोचण्यासाठी हालचाली केल्या.

आजी, माजी सैनिकांना सरकारचं गिफ्ट, हसन मुश्रीफ यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

पुण्यातल्या रुग्णालयातून अवयव घेऊन एक चार्टर्ड विमान हैदराबादला पाठवण्यात आलं. दोन्ही शहरांमध्ये ट्रॅफिक पोलिसाने ग्रीन कॉरिडोरची सोय केली होती. त्यामुळे विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा झाला. हैदराबाद मधील के आय एम एस हार्ट अंड लंग ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटला हे अवयव वेळेत पोहोचले. एका तासात पुणे ते हैदराबाद हा 556 किमी प्रवास शक्य झाला म्हणून संबंधित रुग्णाच्या शरीरात त्यांचं प्रत्यारोपण करणं शक्य झालं.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या