काळजी घ्या! पुढचे 3 दिवस राहणार विचित्र हवामान; आजार बळावण्याची भीती

काळजी घ्या! पुढचे 3 दिवस राहणार विचित्र हवामान; आजार बळावण्याची भीती

उन्हाळ्याची चाहूल लावणारी गरमी अनुभवल्यानंतर अचानक काही भागात गारवा निर्माण झाला आहे. असं विषम हवामान विषाणूंना पोषक असल्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

  • Share this:

पुणे, 12 मार्च  : राज्यात सध्या हवामानात मोठे बदल दिसत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लावणारी गरमी अनुभवल्यानंतर अचानक काही भागात गारवा निर्माण झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दुपारनंतर ढगाळ हवामान निर्माण होत आहे. राज्याच्या काही भागात पुढच्या तीन दिवसात गारपीटीची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे. ढगाळ आणि थंड हवामान आणि तापमानातले चढ-उतार हे आजारांना निमंत्रण करणारं वातावरण असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. Coronavirus चा प्रादुर्भाव अशा हवेत वाढू शकतो.

ऐन मार्च महिन्यातसुद्धा राज्यातील काही ठिकाणी गारव्याची स्थिती आहे. हवामान बदलामुळे आंब्याच्या पिकावर सुद्धा परिणाम झाला आहे. पुण्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत बदल होत आहे. पुणे शहराचं किमान तापमान हे सध्या 15 अंशाच्या खाली आहे. पुढचे तीन दिवस 15 मार्चपर्यंत पुण्याचं किमान तापमान (pune weather) हे 15 अंशाच्या खालीच असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.  पुण्यापाठोपाठ मुंबईतही सध्या वातावरणात पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारवा जाणवत आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात विदर्भात हलक्या स्वरुपाचा गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

 संबंधित - सावधान! पुण्यात 'कोरोना'चे रुग्ण, तुम्हीही होऊ शकता शिकार; असा करा स्वत:चा बचाव

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी विदर्भातसुद्धा काही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हवामान कोरडं होतं. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर विदर्भातील काही भागात किंचित घट झाल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान 14 - 15 मार्च या काळात गोव्यासह संपूर्ण राज्यभरात हवामान काहीसे कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडेच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे

आंबा आणि काजूवर परिणाम

या सततच्या हवामान बदलाचा पिकांवरही परिणाम होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून सतत तापमानात बदल झाला आहे. त्यामुळे काजू आणि आंबा या दोन्ही पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी काजू आणि आंबा या दोन्ही पिकांचं कमी उत्पादन होण्याची भीती यामुळे वर्तवण्यात येत आहे.

वाचा - दारू प्या आणि कोरोनापासून दूर राहा' काय आहे यामागचं सत्य?

एकीकडे कोरोना(corona virus) व्हायरसमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता सोशल मीडियावर कोरोनाबाबत विविध खुलासे सुद्धा येत आहेत. कोरोना व्हायरस हा 27 अंशांवरील तापमानात टीकू शकत नाही असं सर्वत्र सांगितलं जात आहे. पुण्यामध्ये वाढता गारवा असल्यामुळे पुणेकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विषम तापमानामुळे सर्दी, खोकल्याचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.

अन्या बातम्या -

ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस

शिवजयंतीच्या तारखेचा वाद, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

शेतात काम करून झाले MBBS, भावंडानांही शिकवलं; खडसेंवर मात करणारे असे आहेत कराड

First published: March 12, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading