पुणे, 11 जानेवारी : विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश तयार करण्याची चर्चा सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू आहे. पण या गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा समावेश करावा यावरून प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये मतभेद आहेत. याच मुद्द्यावरून आता संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने-सामने आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पुणेरी पगडीची शिफारस केली आहे तर विद्यार्थी संघटनांकडून मात्र फुले पगडीची मागणी केली जात आहे. यावरूनच आता मोठा वाद तयार झाला आहे.