पुण्यातील कचरा प्रश्नावरून विरोधकांचं आंदोलन

पुण्यातील कचरा प्रश्नावरून विरोधकांचं आंदोलन

काही दिवसांपूर्वी फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बंद करण्यासाठीही असंच एक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता एक नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची नितांत गरज आहे. म्हणून पुणे महानगरपालिका हडपसरला एक नवा प्रकल्प उघडणार आहे.

  • Share this:

पुणे,16 ऑक्टोबर: पुण्यातील हडपसर इथं मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचं काम सुरू होताच हडपसरमधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प बंद करण्यासाठीही असंच एक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता एक नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची नितांत गरज आहे. म्हणून पुणे महानगरपालिका हडपसरला एक नवा प्रकल्प उघडणार आहे. पण याच प्रकल्पाचा स्थानिक रहिवासी प्रचंड विरोध करत आहेत. पण प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आज दुपारी भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी पुणे महापालिकेच्या सभागृहाबाहेर घंटानाद आंदोलन केलं. जर दोन दिवसात प्रश्न मार्गी लागला नाही तर कचऱ्याच्या गाड्या अडवू जे काही नुकसान होईल त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल अस नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितलं.त्याच बरोबर सभागृहात ही यावर जोरदार चर्चा झाली विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी ही याच प्रश्नावर पालिकेला धारेवर धरलं

First published: October 16, 2017, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading