मुळशी धरणात 3 विद्यार्थी बुडाले, एका मुलीचा मृतदेह सापडला

मुळशी धरणात 3 विद्यार्थी बुडाले, एका मुलीचा मृतदेह सापडला

सहलीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले. यात दोन मुलांसह एका मुलीचा समावेश आहे.

  • Share this:

पुणे, 02 मे : सहलीसाठी आलेल्या तिघांचा मुळशी धरणात तिघेजण बुडाल्याची घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील वळणे इथं पोहायला उतरलेले तीन विद्यार्थी बुडाले. यात दोन मुलांसह एका मुलीचा समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील वळणे इथं भारती विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी सहलीसाठी आले होते.  धरणात बुडालेल्या मुलांपैकी मुलीचं नाव संगीता नेगी असून शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी दोन मुलांची नावे आहेत. एमबीएचं शिक्षण घेत असलेले हे विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिक,पोलीसाच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे.

SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट

First published: May 2, 2019, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading