कोरोनाचा फटका बसलेल्या पुण्यातील कामगारांना मिळणार पूर्ण पगार, टाटा ग्रुपकडून दिलासा

कोरोनाचा फटका बसलेल्या पुण्यातील कामगारांना मिळणार पूर्ण पगार, टाटा ग्रुपकडून दिलासा

पुण्यातील टाटा ग्रुपचा प्लांट बंद करण्यात येणार असल्यामुळे कर्मचारी काहीसे चिंतेत होते.

  • Share this:

पुणे, 21 मार्च : महाराष्ट्रात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे टाटा ग्रुपने पुण्यातील प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील प्लांटमध्ये सोमवारी 23 मार्चला सर्व प्रकारची काम थांबवण्यात येणार आहेत. त्यानंतर 24 मार्चपासून हा प्लांट बंद करण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यातील टाटा ग्रुपचा प्लांट बंद करण्यात येणार असल्यामुळे कर्मचारी काहीसे चिंतेत होते. मात्र आता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जे कर्मचारी काम करू शकणार नाहीत अशा अस्थायी आणि डेली वर्कर्सला कंपनीकडून पूर्ण पगार देण्यात येईल, अशी घोषणा टाटा ग्रुपने केली आहे.

महाराष्ट्रातील आकडा वाढला!

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता 63 वर पोहोचली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज 21 मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही 63 वर पोहोचली आहे. शुक्रवारीही संख्या 52 वर होती. त्यामुळे गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळून आल्याची बाब समोर आली आहे.

राज्यातील 4 शहरं बंद करण्याची घोषणा

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी कडकं पावलं उचलली आहे. मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दिली.

First Published: Mar 21, 2020 01:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading