पुण्यात 'सनबर्न फेस्टिव्हल'ला या कारणांमुळे होतोय विरोध

पुण्यात 'सनबर्न फेस्टिव्हल'ला या कारणांमुळे होतोय विरोध

दरवर्षी सनबर्न आणि वाद हे दोघे हातात हात घालूनच येतात. कितीही विरोध झाला तरी या फेस्टिव्हलला तरूणांची अलोट गर्दी होते.

  • Share this:

पुणे 28 डिसेंबर : उडत्या चालीची गाणी. त्यावर बेधुंद झालेली तरूणाई, कर्कश्य आवाज ही ओळख आहे सनबर्न फेस्टिव्हलची. दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हा गाण्यांचा कार्यक्रम होत असतो. आधी तो गोव्यात व्हायचा. आता पुण्यात होतो. मात्र या कार्यक्रमात अनेक अवैध गोष्टी होत असल्यामुळे 'सनबर्न फेस्टिव्हल'ला कायम विरोधाचा सामना करावा लागतो.

पुण्यातल्या बावधन जवळच्या लवळे गावाच्या डोंगर पायथ्याशी या उत्सवाची सध्या जोरदार  तयारी केली जात आहे. मात्र सनबर्न फेस्टिव्हल मागे लागलेली वादाची मालिका यंदाही सुरूच आहे.

हा फेस्टिव्हल रोखता यावा यासाठी आता पुण्यातल्या अनेक राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

सनबर्न फेस्टिव्हलला विरोध कशासाठी?

आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन

ध्वनी प्रदूषणासह पर्यावरणाची हानी

बेकायदेशीर उत्खनन आणि डोंगर सपाटीकरण

झाडांची बेसुमार कत्तल

अंमली पदार्थ विक्रीचा आरोप

नेहमी हिंदू सणांसाठी लावले जाणारे नियम सनबर्नला का नाहीत असा सवाल सनातन सारख्या काही संघटनांनी करत असतात.  2007 पासून गोव्यामध्ये आयोजित केला जाणारा सनबर्न 2016 पासून पुण्यात आय़ोजित करण्यात येतोय.

2016 मध्ये पुण्यातल्या केसनंद परिसरात आयोजित केलेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्टेजला आग लागल्याचा प्रकारही घडला होता. सनबर्नला मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी देऊन 75 डेसिबलची मर्यादा पाळण्याची अट घातली आहे.

दरवर्षी सनबर्न आणि वाद हे दोघे हातात हात घालूनच येतात.  कितीही विरोध झाला तरी या फेस्टिव्हलला तरूणांची अलोट गर्दी होते. यंदाही वादाचं सत्र सुरू असलं तरी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा हा फेस्टिव्हल कसा साजरा होणार याचीच आता सगळ्यांना उत्सुकता आहे.

VIDEO : जिओ फोन-2च्या सेलला सुरुवात, असं करा बुकिंग

First published: December 28, 2018, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading