Home /News /maharashtra /

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळेल शिवभोजन थाळी

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळेल शिवभोजन थाळी

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर येथे लोकांना जेवता येणार आहे.

    पुणे, 26 जानेवारी :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात शिवभोजन थाळीचं उद्घाटन झालं. पुण्यात सात ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे. मात्र प्रत्येक केंद्रात रोज किमान 75 आणि कमाल 150 जणांना शिवभोजन थाळी मिळणार आहे. दुपारी 12 ते 2 यावेळेत शिवभोजन थाळी मिळणार आहे. त्यामुळे केवळ गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सुसूत्रता असावी, यासाठी जेवणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांकदेखील नोंदवून घेण्यात येणार आहे. यासाठी महा अन्नपूर्णा या नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर येथे लोकांना जेवता येणार आहे. पुण्यातील ‘या’ भागात मिळणार शिवभोजन थाळी -पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा -कौटुंबिक न्यायालय -कात्रज कॉर्नरजवळी जेएसपीएमते उपहारगृह -स्वारगेट, एसटी स्थानक -गुलटेकडी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र.11 -महात्मा फुले मंडई -हडपसर, गाडीतळाजवळील शिवसमर्थ भोजनालय पिंपरी-चिंचवडमध्ये ‘या’ भागात मिळणार शिवभोजन थाळी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपहारगृह -यशवंतराव चव्हाण रुग्णालय -वल्लभनगर बसस्थानक -पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण 100 ग्रॅम भाजी...150 ग्रॅम भात, अशी असेल शिवभोजन योजनेतील 10 रुपयांची थाळी शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना 10 रुपयात जेवण उपलब्ध करून घ्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही आता काढण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवभोजन सुरू होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज सुमारे 150 नागरिक या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत. या भोजनालयात एकावेळी किमान 25 लोक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: #Pune

    पुढील बातम्या