पुणे रेल्वे स्टेशन स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या टाॅप 10 यादीत, 75 वरुन 9 वर मुसंडी

पुणे रेल्वे स्टेशन स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या टाॅप 10 यादीत, 75 वरुन 9 वर मुसंडी

विशेष म्हणजे 75 स्टेशनच्या यादीत शेवटच्या म्हणजे 75 व्या स्थानावरून पुण्याने नवव्या क्रमांकावर मुसंडी मारलीय.

  • Share this:

18 मे : स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या टॉप 10 यादीत पुण्याने 9 वं स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे 75 स्टेशनच्या यादीत शेवटच्या म्हणजे 75 व्या स्थानावरून पुण्याने नवव्या क्रमांकावर मुसंडी मारलीय.

काही दिवसांपूर्वी कचरा कोंडीमुळे पुणे चर्चेत आलं होतं. तर  स्वच्छ भारत अभियानतील स्वच्छ शहरांची यादीत पुण्याने 13 वा क्रमांक पटकावलाय. स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याची एक चांगली  बाजूही समोर आलीये. पुणे रेल्वे स्टेशन स्वच्छतेच्या बाबतीत नववा क्रमांक पटकावलाय.

प्लॅटफॉर्म, रूळ,वेटिंग रूम स्वच्छता, सुशोभीकरण,ओला -सुका कचऱ्याचं वर्गीकरण, भिंतींवरची चित्रं यामुळे पुणे स्टेशनचं चित्र पालटून गेलंय. स्टेशन स्वच्छ राखणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुढील वर्षी पहिला नंबर मिळवण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

First published: May 18, 2017, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading