'लाडक्या 'बाप्पा'ला निरोप द्यायला पुणेकर सज्ज

'लाडक्या 'बाप्पा'ला निरोप द्यायला पुणेकर सज्ज

यासाठी वाहतूक पोलिसांचे 83 वाहतूक पोलीस अधिकारी, 1 हजार 70 वाहतूक कर्मचारी तसेच शहर पोलीस तैनात असणार आहेत.

  • Share this:

पुणे, 05 सप्टेंबर: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालं आहे. विसर्जन मिरवणुकीची सगळी तयारी पुण्यात झालेली आहे.

आज विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. पुणे शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरून गणपती विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांचे 83 वाहतूक पोलीस अधिकारी, 1 हजार 70 वाहतूक कर्मचारी तसेच शहर पोलीस तैनात असणार आहेत. शहरातील लक्ष्मी रस्त्यावरून 241 मंडळांची, कुमठेकर रस्त्यावरून 47 मंडळांची, तर टिळक रस्त्यावरून 197 मंडळाची मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी 110 सीसीटीव्ही या तीन रस्त्यांवर तैनात असतील. तसंच शहरातील महत्वाचे 17 रस्ते बंद असणार आहेत.

येणाऱ्या भक्तांसाठी 8 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 08:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading