अरारा....खतरनाक! 125 फुटी बॅनरवर तब्बल 6500 फोटो, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची करामत

येणारे जाणारेही या पोस्टरकडे पाहून थांबत आपलाही फोटो यामध्ये आहे का, हे शोधत आहेत.

येणारे जाणारेही या पोस्टरकडे पाहून थांबत आपलाही फोटो यामध्ये आहे का, हे शोधत आहेत.

  • Share this:
जुन्नर, 15 डिेसेंबर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर बस स्थानकापुढे लावलेला एक मोठा फ्लेक्स चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियामध्ये या फ्लेक्सची जोरदार चर्चा रंगत आहे. तसंच येणारे जाणारेही या पोस्टरकडे पाहून थांबत आपलाही फोटो यामध्ये आहे का, हे शोधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान शिवसेना जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचे सुपुत्र अमोल लांडे यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यानंतर अमोल लांडे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. या निमित्ताने आपली ओळख आणि पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी लांडे यांनी भर चौकात 125 फूट लांब व 22 फूट उंच असा तब्बल 2750 स्क्वेअर फुटांचा बॅनर लावला आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या फोटोसह मतदार संघातील तब्बल 6500 नागरिकांचे फोटो झळकले आहेत. यात छोट्या शाळकरी मुलांसह महिला, पुरुष, वृद्ध यांचा समावेश आहे. जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांकडून काही क्षण थांबून आपला फोटो यात नाही ना? असा शोधही घेतला जात आहे. प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात तर प्रसिद्धीसाठी अनेक नव्या गोष्टी केल्या जातात. यातूनच हा 125 फुटी बॅनर लावला आहे. इतकंच नाही, तर आपले किती समर्थक आहेत याचं प्रदर्शन करण्यासाठी या पट्ठ्याने हजारो लोकांच्या फोटोंचा कोलाजच तयार केला आहे. त्यामुळे या बॅनरजी जोरदार चर्चा आहे. जुन्नरच्या या बॅनरबाजीने स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीचा नवा फंडा समोर आणला आहे. जुन्नर तालुक्यात या वेगळ्याच “फ्लेक्सबाजीच्या” माध्यमातून नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: