पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

आज महात्मा फुले मंडईतील टिळक चौकात टिळकांच्या पुतळ्याला महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

  • Share this:

पुणे,05 सप्टेंबर: पुण्यात यावर्षी टिळक-भाऊ रंगारी वाद पेटला असला तरी त्याचा गणेशोत्सवावर जास्त परिणाम जाणवला नाही. 12 दिवस उत्सव साजरा केल्यानंतर  बाप्पाला निरोप देण्यास सुरूवात झाली  आहे.बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्तोरस्ती रांगोळी काढण्यात आली आहे.

आज महात्मा फुले मंडईतील टिळक चौकात टिळकांच्या पुतळ्याला महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाची त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात तुतारी वादनाने पारंपारिक पद्धतीने पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात झाली आहे.

First published: September 5, 2017, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading