गांधींजींमुळे सुटले पण आचारसंहितेमुळे अडकले

गांधींजींमुळे सुटले पण आचारसंहितेमुळे अडकले

देशातील विविध तुरुंगांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या अनेक कैद्यांना महात्मा गांधींच्या 150व्या जयंती निमित्त तुरुंगातून लवकरच सोडण्यात येणार आहे.

  • Share this:

पुणे, 02 ऑक्टोबर: देशातील विविध तुरुंगांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या अनेक कैद्यांना महात्मा गांधीं (Mahatma Gandhi)च्या 150व्या जयंती निमित्त तुरुंगातून लवकरच सोडण्यात येणार आहे. ज्या कैद्यांवर दहशतवाद, हत्या, महिलांवर अत्याचार असे गंभीर गुन्हे नाहीत, अशा कैद्यांपैकी चांगली वर्तणूक पाहून त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण देशातील अन्य राज्यातील कैदी तुरुंगातून लवकर सुटतील पण महाराष्ट्रातील कैद्यांसाठी मात्र यासाठी थोडा अधिक वेळ वाट पहावी लागणार आहे.

महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती निमित्त देशातील अन्य राज्यातील कैद्यांप्रमाणे महाराष्ट्रातील 70 कैद्यांची तुरुंगातून सुटका होणार होती. पण देशातील अन्य राज्यांतील कैद्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कैद्यांना बाहेर पडण्यास थोडा अधिक वेळ लागणार आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक आयोगाने राज्यात आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोणताही मोठा निर्णय घेता येत नाही. राज्याच्या कारागृह विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यातून 119 कैद्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. यात दहशतवाद, हत्या आणि महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्या कैद्यांचा समावेश नव्हता. यातील 70 कैद्यांची सुटका करण्यावर निर्णय झाला आहे. पण राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे गांधी जयंती निमित्त या कैद्यांच्या सुटकेचे आदेश देता येत नाहीत.

राज्यात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि त्यासाठीची मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 288 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा कालावधी 9 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. गेल्यावेळी म्हणजे 2014मध्ये विधानसभेसाठी 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी 2014च्या तुलनेत 59 लाख 17 हजार 901 इतके मतदार वाढले आहेत. 21 ऑक्टोबर रोजी 1.80 लाख ईव्हीएमद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युती केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील आघाडी झाली आहे. 2014मध्ये या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 07:53 AM IST

ताज्या बातम्या