Lok Sabha Election 2019 : पुण्याचे 'हे' पोलीस अधिकारी भाजपच्या तिकीटावर ?

Lok Sabha Election 2019 : पुण्याचे 'हे' पोलीस अधिकारी भाजपच्या तिकीटावर ?

पुण्यातील अतिरिक्त पोलीस आयुक्त आता भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

  • Share this:

पुणे, वैभव सोनावणे, 15 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या देशातील राजकीय परिस्थिती पाहता अनेक पक्षांनी आता जास्तीस जास्त उमेदवार निवडून आणण्यावर भर दिला आहे. अनेक जण आता राजकीय कारकिर्द घडवण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. यापूर्वी पोलीस दलातील अनेकांनी राजकारणात प्रवेश करत आपली राजकीय कारकीर्द घडवल्याचं पाहायाला मिळालं. त्यामध्ये आता आणखी एक नाव वाढण्याची शक्यता आहे. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त साहेबराव पाटील जळगावमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भाजपनं उमेदवारीची खात्री दिल्यास साहेबराव पाटील राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहेबराव पाटील यांच्या निर्णयाकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मागील 30 वर्षापासून साहेबराव पाटील पोलीस दलात आहेत. पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या देखील पार पाडल्या आहेत.

उस्मानाबादची उमेदवारी कोणाला मिळणार? गायकवाड आणि निंबाळकर यांच्यात चुरस

भाजप नव्या चेहऱ्यांना देणार संधी

भाजपनं देखील आता लोकसभेसाठी कंबर कसली असून आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा आहे. राज्यातून देखील भाजपनं त्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत. राष्ट्रीय स्वसंसेवक संघानं देखील त्यामध्ये जातीनं लक्ष घातलं आहे. त्यामुळे कुणाचा पत्ता कट होणार? आणि कुणाला संधी मिळणार? हे पाहावं लागणार आहे.

2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं देशभर सर्व्हे केला आहे. यामध्ये विद्यमान खासदाराच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. शिवाय, जनभावनांचा देखील विचार करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. शिवाय, राज्यातून 45 खासदार निवडून आणण्याचं उदिष्ट शिवसेना - भाजपनं ठेवलं आहे. परिणामी, भाजपमधील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच काही उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण, भाजपनं मात्र उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता भाजपच्या यादीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी केले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक, पाहा UNCUT भाषण

First published: March 15, 2019, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading