मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Valentine Week मध्ये पुणे पोलिसांनी तरुणाला दिलं ‘लय भारी गिफ्ट’

Valentine Week मध्ये पुणे पोलिसांनी तरुणाला दिलं ‘लय भारी गिफ्ट’

पुणे पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर विविध प्रकारचे मिम्सही शेअर करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर विविध प्रकारचे मिम्सही शेअर करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर विविध प्रकारचे मिम्सही शेअर करण्यात आले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
पुणे, 8 फेब्रुवारी : सध्या देशभरात विविध Days साजरे केले जात आहे. कालच Rose Dayच्या निमित्ताने महाविद्यालयं, कार्यालयात अनेकांनी आपल्या आवडीच्या व्य़क्तीला गुलाबाचं फूल देऊन आभाराचा संदेश दिला असेल. मात्र पुणे पोलिसांनी एका तरुणाला खास गिफ्ट  देऊ केलं आहे. हे गिफ्ट त्या तरुणाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रभरात हेल्मेट सक्ती असून प्रत्येक दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. जी व्यक्ती हेल्मेट घालत नाही त्याला दंड भरावा लागतो. असंच पुण्यातील एका तरुणाला विनाहेल्मेट पकडल्यानंतर घडलेली घटना खूपच रंजक आहे. या तरुणाने हेल्मेट घातले नव्हते. पुणे पोलिसांनी याला पकडल्यानंतर या तरुणाने हेल्मेट घालू न शकल्याचे कारण सांगितले. दुचाकीवरुन पडल्याने या तरुणाचे हेल्मेट तुटले होते. त्यामुळे तो हेल्मेट घालू शकत नव्हता. शिवाय महिन्याचं पॉकेटमनी संपल्याने तो नवं हेल्मेटही खरेदी करू शकत नव्हता, असं सर्व प्रामाणिकपणे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले. या महिन्यात मला विनाहेल्मेटसाठी दंड करू नका, मी पुढल्या महिन्यात नक्की हेल्मेट विकत घेईन पण या महिन्यात शक्य होणार नाही; अशा आशयाचा संदेश त्याने ट्विट केला आहे. यावर पुणे पोलिसांनी मात्र त्याला त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेलं हेल्मेटचं गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे. यासाठी सोमवारी पुणे पोलिसांनी या तरुणाला कमिशनर कार्यालयात येण्याचं आवाहन केलं आहे. या तरुणाचं नाव तेजस येवतेकर असून पुणे पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर हजारो प्रतिक्रिया येत आहे. यावर विविध प्रकारचे मिम्सही शेअर करण्यात आले आहेत. Valentine Week मध्ये पुणे पोलिसांनी तरुणाला भारी गिफ्ट दिलं आहे.
First published:

Tags: Pune police

पुढील बातम्या