Home /News /maharashtra /

VIDEO : राणू मंडलनंतर पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल झाला सोशल मीडियाचा हिरो, गाण्याची तुफान चर्चा

VIDEO : राणू मंडलनंतर पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल झाला सोशल मीडियाचा हिरो, गाण्याची तुफान चर्चा

सागर हा अत्यंत सुरेल आवाजाचा गायक असल्याने त्याने रेकॉर्ड केलेलं गाणं हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहे.

    वैभव सोनवणे, पुणे, 2 जानेवारी : सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणू मंडल (ranu mandal) याचं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता पुणे पोलीस दलाचा कॉनस्टेबल सागर घोरपडे हा सोशल मीडीयाचा नवा हिरो ठरू लागला आहे. सागर हा अत्यंत सुरेल आवाजाचा गायक असल्याने त्याने रेकॉर्ड केलेलं गाणं हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहे. तसंच त्याच्या आवाजाचंही प्रचंड कौतुक सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणणारी नोकरी जपत गायनाची संवेदनशील कला ही सागर घोरपडे यांनी जपली आहे. एखाद्या कसलेल्या गायकाप्रमाणे गाणारा हा वर्दीतला गायक आहे विठ्ठल उर्फ सागर घोरपडे. सागरने त्याच्या वाढदिवसानिमित्त गायलेलं गाणं फेसबुकला टाकलं आणि चक्क तीनच दिवसात हे गाण तब्बल १५ लाख जणांनी पाहिलं आहे. सागरच्या आवाजाचं प्रचंड कौतुक सोशल मीडीयावर सुरू आहे. त्यातूनच मग सागरला आणखी गाणी रेकार्ड करून टाकण्याची मागणी सुरू झाली आहे. स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या धुम स्टाईल चोरीचा VIDEO VIRAL सागर मूळचा सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या मंगळवाडीचा. घरी कीर्तन आणि हरिनाम सप्ताहात गाण्याची त्याला सवय होती. मात्र 2012 मध्ये पोलीस दलात भरती झाल्यापासून स्टेजचा आणि त्याचा संपर्क तुटला. मात्र अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये गायल्यावर त्याला अनेक मित्रांनी गाण गात राहाण्याची मागणी केली. त्यानुसार त्याने काही गाणी रेकार्ड करून फेसबुकला टाकल्यावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. वर्दीतला हा दर्दी बघून आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण वर्दीतल्या खात्यात नोकरीला असल्याने आता वरिष्ठांची परवानगी घेऊन मग पुढची गाणी गाऊयात अशी भूमिका त्याने घेतली आहे. सागर घोरपडे याच्या आवाजाने पोलीस दलाचा ही सन्मान वाढवला आहे आणि सोशल मीडीयालाही राणू मंडल नंतर आणखी एक हिरो मिळाला आहे, अशी चर्चा आता पुण्यात होत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune breaking, Pune police

    पुढील बातम्या