तब्बल 200 घरफोड्या !!! करणाऱ्या भामट्याला पुण्यात अटक

पुणे पोलिसांनी तब्बल दोनशे घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. रवी गोपाळ शेट्टी असं या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे. वयाच्या साठीत पोहोचलेला हा भामटा गेल्या वीस वर्षांपासून मुंबई - पुणे परिसरात घरफोड्या करत फिरतोय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 02:54 PM IST

तब्बल 200 घरफोड्या !!! करणाऱ्या भामट्याला पुण्यात अटक

पुणे, 28 सप्टेंबर : पुणे पोलिसांनी तब्बल दोनशे घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. रवी गोपाळ शेट्टी असं या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे. वयाच्या साठीत पोहोचलेला हा भामटा गेल्या वीस वर्षांपासून मुंबई - पुणे परिसरात घरफोड्या करत फिरतोय. आतापर्यंत त्याने तब्बल २०० हून अधिक घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात कबूल केलय. त्यामुळे पोलीसही अवाक झालेत.

या भामट्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघून तुम्ही कदाचित त्याला कदाजित दयाच दाखवाल, पण तसं अजिबात नाहीये. मूळचा कर्नाटकचा असलेला हा भामटा पनवेलमध्ये राहतो. रवी शेट्टी याची घरफोडी करायची पध्दतच वेगळी आहे. तो स्वत:सोबत छोटा सिलेंडर असलेला कटर घेऊनच फिरायचा आणि दरवाजा बंद दिसला की कटरच्या साह्याने कुलूप कापायचं आणि घरातलं सामान घेऊन पोबारा व्हायचं, अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती. त्याने पुणे परिसरात १२० तर, मुंबईत ८० घरफोड्या केल्यात, पुणे पोलिसांनीच ही माहिती दिलीय. पोलिसांनी या भामट्याकडून तब्बल ५१५ ग्रॅम सोनं, ८ मोबाईल आणि घरफोडीसाठी लागणारी विविध हत्यारंही जप्त केलीत.

चोरलेलं सोनं आणि चांदी वितवळण्यासाठी लागणारं कटर आणि गॅस सिलेंडरही पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केलंय.

Loading...

पुण्यातील लोहगाव परिसरात तो अॅक्टिवा टू व्हीलरवरून संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळून आला. त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्यात घरफोडीसाठी लागणारं साहित्य मिळालं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तो अट्टल घरफोड्या गुन्हेगार असल्याचं समोर आलंय.

शेट्टी मूळचा कर्नाटकचा असून, सध्या तो पनवेल परिसरात स्थायिक झाला आहे. त्यामुळं नवी मुंबई परिसरात देखील त्यानं काही घरफोड्या केल्या आहेत का. याचाही शोध पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...